आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत बेकायदा स्थलांतरणाचे संकट: दुरावलेले 500 मुले नातेवाइकांकडे सोपवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- मध्य अमेरिकेत बेकायदा स्थलांतरणप्रश्नी निर्वासितांपासून वेगळे केलेल्या २३०० हून जास्त मुले मेक्सिकोच्या सीमेवर पोहोचवण्याचे काम सुरू आहे. शनिवारपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांहून ८५० मुलांना तेथे रवाना करण्यात आले आहे. आई-वडिलांपासून दूर ठेवण्याचा आदेश रद्द झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत ५०० मुलांना त्यांच्या नातेवाइकांकडे सोपवण्यात आले आहे.

 

या मुलांना ५ मेपासून त्यांच्या कुटुंबापासून दूर ठेवण्यात आले होते. अमेरिकेत स्थलांतरणासंबंधीच्या नवीन धोरणानुसार मेक्सिको सीमेवरून देशात प्रवेश करणाऱ्या कुटुंबांच्या मुलांना त्यांच्यापासून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ट्रम्प यांनी त्यास विरोध केला. त्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय मागे घेतला होता. बालिकांना काही दिवस शिबिरात ठेवले जाणार आहे.   

 

२० हजार मुलांसाठी शिबिर बनवण्याची केली विनंती  

लष्करी क्षेत्रात २० हजार मुलांची सोय होऊ शकेल एवढ्या शिबिरांची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती अमेरिकेच्या आरोग्य व मानवी सेवा विभागाने संरक्षण विभाग पेंटागॉनकडे केली आहे. त्यामुळे लहान मुलांची योग्य प्रकारे देखभाल करणे शक्य होऊ शकेल. अमेरिकेच्या नौदलानेही कॅलिफोर्निया, अल्बामा व अॅरिझोनामध्ये  २५ हजार स्थलांतरितांसाठी शिबिरे तयार करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल व १६ हजार कोटी रुपये खर्च येईल.   

 

कचरा मानल्या गेलेल्या लोकांनी येऊ नये : ट्रम्प   

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरणविरोधी आपली कडक भूमिका कायम ठेवली. बेकायदा नव्हे, तर गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश करा. मायदेशात कचरा समजल्या जाणाऱ्यांनी अमेरिकेत येता कामा नये, असे त्यांनी बजावले. ट्रम्प यांनी २०११ च्या सरकारी अहवालाचा हवाला दिला. अटकेतील २५ हजारांवर हत्येचा गुन्हा, ४२ हजारांवर लूट, सुमारे ७० हजारांवर लैंगिक गुन्हे व १५ हजारांवर अपहरणाचे गुन्हे असल्याचे स्पष्ट केले.  

 

 

बातम्या आणखी आहेत...