आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्फवृष्टीतही आजारी मुलास हवाई दलाच्या वैमानिकांनी नेले रुग्णालयात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- हवाई दलाच्या वैमानिकांनी प्राणांची बाजी लावत, अपेंडिसायटिसच्या वेदनेने तळमळत  असलेल्या ९ वर्षांच्या चिमुरड्यास हेलिकॉप्टरने  रुग्णालयात दाखल करून त्याचे प्राण वाचवले. हवाई दलाने बर्फवृष्टी होत असताना आणि ढगाळ वातावरण असताना प्रतिकूल हवामानातही काश्मीरच्या गुरेज दुर्गम भागात ही मोहीम राबवली.   


गुरेजच्या दुर्गम भागात तौसिफ या ९ वर्षे वयाच्या मुलास अपेंडिसायटिसचा त्रास होता. उपचारासाठी त्याला श्रीनगरला नेणे आवश्यक होते. एक हेलिकॉप्टर या मोहिमेसाठी तयार ठेवण्यात आले होते. परंतु गुरुवारी सकाळपर्यंत हवामान अनुकूल झालेले नव्हते. वैमानिक स्क्वॉड्रन लीडर विनीतसिंह सिकरवार आणि सहचालक लक्ष्य मित्तल यांनी अशा प्रतिकूल हवामानात हेलिकॉप्टर त्या भागात उतरवले. 

बातम्या आणखी आहेत...