आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरी क्षेत्रात पाकचा तोफगोळ्यांचा मारा;ताबा रेषेपासून दूर व्हा,नागरिकांना पाकचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो - Divya Marathi
सांकेतिक फोटो

श्रीनगर- पाकिस्तानी लष्कराने शनिवारी सकाळी बारामुला जिल्ह्यात उरी सेक्टरमध्ये युद्धबंदी मोडत भारतीय हद्दीत तोफगोळ्यांचा मारा केला. सोबत लाऊडस्पीकरवर सामान्य नागरिकांनी ताबा रेषेवरून दूर जावे, असा इशारा दिला. 


सकाळी साडेअकराच्या सुमारास ताबा रेषेनजीक असलेल्या भारतीय चौकींवर पाकिस्तानी सैनिकांनी अचानक गोळीबार सुरू केला. भारतीय जवानांनीही याला चोख प्रत्युत्तर दिले. हा गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा सुरू असताना लाऊडस्पीकरवर लोकांना पाक सैनिकांनी इशारा दिला. दरम्यान, भारतीय जवानांनी उडी सेक्टरमधून १०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. ५०० लोक अगोदरच घरे सोडून सुरक्षित स्थळी गेले आहेत. दरम्यान, उडी तहसीलमधील सिलिकोट आणि चुरंडा गावात पाकचा गोळीबार व ताेफगोळ्यांच्या माऱ्यामुळे घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...