आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात सराईत गुन्हेगार माफीची पाटी घेऊन फिरले; जामिनावर तुरुंगातून आले बाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शामली- उत्तर प्रदेशातील शामलीतील कैराना कोतवाली भागात दोन सराईत गुन्हेगार यापुढे गुन्हे करणार नसल्याची पाटी गळ्यात पाटी घालून फिरत आहेत. “मी भविष्यात कोणत्याही गुन्ह्यात सहभागी होणार नाही. कठोर परिश्रम करून पैसे कमावेन. कृपया, आम्हाला माफ करा,’ असे पाटीवर लिहिलेले आहे. पोलिस चकमकीत आपल्याला ठार मारतील अशी या दोघांना भीती वाटते. यामुळे अशा पद्धतीने ते जाहीर माफी मागत आहेत.   


सलीम अली आणि इर्शाद अहमद नावाचे दोन्ही गुन्हेगार अनेक हत्या व लूट प्रकरणात आराेपी आहेत. त्यांना नुकतेच जामिनावर सोडण्यात आले आहे. त्यांनी शामली जिल्हा पोलिस अधीक्षक अजय शर्मा यांच्यासमक्ष शपथपत्र दिले आहे. पोलिसांनी सांगितले, या दोघांवर शामली व कैराना ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आता ते गुन्ह्याचा मार्ग सोडून चांगले जीवन जगू इच्छितात. इतर गुन्हेगारांप्रमाणे त्यांना पोलिस चकमकीची भीती वाटते. 

 

पोलिस अधीक्षक म्हणाले, पोलिसांची भीती आवश्यक  
पोलिस अधीक्षक अजय शर्मा यांनी सांगितले, सलीम व इर्शाद यांनी आपली भेट घेतली होती. ते दोघे गुन्ह्याचा मार्ग सोडून चांगले जीवन जगण्याचे ठरवत असतील तर चांगली बाब आहे. गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटते आहे, असे त्यांच्या अर्जावरून दिसते. गेल्या सहा महिन्यांपासून पोलिस अधीक्षक अजयपाल शर्मा यांना “एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हटले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...