आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विधानसभेत अतृप्त आत्मा, म्हणून 200 आमदार कधीच एकत्र नव्हते’;भाजप आमदारांचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- राजस्थान विधानसभा.. येथे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदे तयार केले जातात. परंतु याच विधानसभेत अतृप्त आत्मा भटकत असल्याचे सांगत, अामदारांनी खळबळ उडवून दिली. सभागृहात एकाच वेळी २०० आमदार कधीच एकत्र बसलेले दिसले नाहीत. कोणी तुरुंगात जातो तर कोणाचा मृत्यू होतो.  या सभागृहाच्या वास्तुशांतीसाठी हवन व यज्ञ करावेत आणि पंडितांना जेवण द्यावे. तरच या विधानसभेतून काळी सावली दूर होईल, अशी मागणी करून बुचकळ्यात टाकले. नाथद्वाराचे भाजपचे ज्येष्ठ आमदार कल्याणसिंह यांचा मृत्यू झाला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी कालूलाल गुर्जर आणि नागोरचे भाजप आमदार हबीबुर रहमान अशरफी लांबा यांनी वरील प्रस्ताव मांडले. त्यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत जणू भूत-खेत वावरतात, असे वाटते. 

 

ही जमीन अामची, इथे भूत-प्रेत नाहीच

विधानसभेच्या जागेच्या मागे स्मशानभूमी अाहे, मात्र या ठिकाणी भूत- प्रेत नाहीत. विधानसभेची इमारत व मुख्य प्रवेशद्वार अामच्या जमिनीवर उभारलेली अाहे. सरकारने ही जमीन संपादित केली मात्र अाजवर त्याचा मावेजा दिलेला नाही. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या अामदारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ज्या कुटुंबातील चार पिढ्या मावेजाच्या प्रतीक्षेत दिवंगत झाल्या, त्यांच्या वारसांना आता तरी मावेजा द्यावा.  १९६४ मध्ये सरकारने अनेक लाेकांची १७०० एकर जमीन संपादित केली हाेती.  हायकाेर्टात अामचा खटलाही सुरू अाहे.

- प्रेम बियाणी, महामंत्री, फोर्टी

 

नागौरचे आमदार अशरफी म्हणाले, एकत्र २०० अामदार कधीच दिसले नाहीत, याचे कारण काय? 
नागौरचे भाजप आमदार अशरफी यांनी म्हटले, विधानसभा स्मशानभूमीवर बांधण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीत अशी मान्यता आहे. मग विधानसभेत का मानले जाऊ नये. मुख्यमंत्र्यांसमवेत माझी चर्चा झाली आहे.  यावरून आमदारांतही आपसात चर्चा सुरू आहे. २०० अामदार एकत्र न दिसण्याचे कारण काय? 

 

भाजप गटनेता कालूलाल गुर्जर यांनी म्हटले, जेथे विधानभवन बांधले ती स्मशानभूमी होती, या ठिकाणी एखादा आत्मा भटकत असावा 
विधानसभेबाहेर पत्रकारांशी बोलताना भाजप गटनेता कालूलाल गुर्जर यांनी सांगितले, हा जाे विधानसभेचा परिसर आहे,ती पूर्वी स्मशानभूमी होती. येथे मृत मुलांना पुरले जायचे. येथील ज्या आत्म्यांना मुक्ती मिळालेली नाही, ती येथे भटकत असावी. आजवर सभागृहात एकाच वेळी २०० सदस्य उपस्थित कधीच राहिलेले नाहीत. कोणी तुरुंगात जातो.  तर काेणाचा मृत्यू होतो. मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात आपली चर्चा झाली आहे, असे गुर्जर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...