आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात 85% घरांमध्ये वीज पोहोचली, वर्ल्ड बँकेच्या अहवालात विकासकामाचे कौतुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - वर्ल्ड बँकेने आपल्या अहवालात भारतात होणाऱ्या पुरवठ्याचे अहवालातून कौतुक केले आहे. या अहवालानुसार भारतातील 85% लोकांच्या घरांत वीज पोहोचली आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकार 80% घरांमध्ये वीज पोहोचल्याचा दावा करत आहे. देशात 2010 पासून 2016 पर्यंत दरवर्षी 3 कोटी जनतेला वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

 

बांग्लादेश केन्या भारतापेक्षा पुढे
- वर्ल्ड बँकचे लीड एनर्जी इकॉनोमिस्ट विवियन फॉस्टर यांनी सांगितल्याप्रमाणे, "साहजिकच, या गोष्टीवर आश्चर्य बसेल की सरकार 80% घरांमध्ये वीज पोहोचल्याचा दावा करत आहे. पण, आमच्या आकडेवारीप्रमाणे, आतापर्यंत भारतातील 85% घरांत वीज पोहोचली आहे. जगातील इतर देशांसोबत तुलना केल्यास हे विकासकाम कौतुकास्पद आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, बांग्लादेश आणि केन्या भारतापेक्षा पुढे जात आहेत."


अखंडित वीज पुरवठा एक आव्हान
- फॉस्टर म्हणाले, "भारतात इलेक्ट्रिफिकेशन आता अंतिम टप्प्यात आहे. दूरवरच्या ग्रामिण भागांमध्ये वीज पोहोचवणे भारतासाठी एक आव्हान आहे. सोबतच, ज्या ठिकाणी आधीच वीज उपलब्ध आहे त्या ठिकाणी सलग अखंडित वीज पुरवठा कसा करता येईल हे सुद्धा पाहावे लागेल. कारण, अजुनही 15 टक्के भागांत वीज पोहोचलेली नाही. केवळ नवीन ठिकाणी वीज पोहोचवणेच नव्हे, तर आधीच पोहोचलेल्या भागांत ते अखंडित ठेवण्याची व्यवस्था भारताला करावी लागणार आहे. तरीही प्रत्येक घरात वीज पोहोचविण्याचे लक्ष्य भारत डेडलाइन संपण्यापूर्वीच साध्य करेल अशी अपेक्षा करतो."

बातम्या आणखी आहेत...