आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक म्हणतो, जुगराज गुप्तहेर नाही; तो रेल्वेत विनातिकीट सापडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - पाकिस्तानच्या कराची तुरुंगात असलेल्या जुगराज भिल्ल या २० वर्षे वयाच्या तरुणाच्या बाबतीत महत्त्वाची माहिती हाती आली आहे. जुगराज हा मूळचा बुंदीचा राहणारा आहे. तो पाच वर्षांपासून बेपत्ता होता. जयपूर येथील गजानंदप्रमाणे तोसुद्धा पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे वृत्त सर्वप्रथम भास्करने दिले होते.

 

जुगराज पाकिस्तानात पोहोचला कसा, याचे उत्तर भारतीय सीमेवर कोणाकडेही नाही. पण पाकिस्तानी कागदपत्रांत तो ट्रॅक्टर घेऊन पाकिस्तानच्या हद्दीत आल्याचा दावा आहे. जुगराज भारतीय नागरिक असल्याचे कागदोपत्री छाननीत  निष्पन्न झाले. तो लाहोरमध्ये झेलम एक्स्प्रेसमधून विनातिकीट प्रवास करताना पकडला गेला. त्याची चौकशी सुरू झाली. त्याच्याकडे पासपोर्ट अथवा व्हिसा नसताना तो पाकिस्तानात फिरत असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याला अटक करण्यात आली. 

 

आई म्हणाली, माझा मुलगा मंदबुद्धी.. तो तिकडे गेला कसा? 

बुंदी सीमेवर रामपुरिया गावातील भिल्लाची झोपडी. एवढाच जुगराजचा पत्ता. त्याची आई पानाबाई हिच्याशी संवाद साधला असता, ती भरल्या गळ्याने म्हणाली, माझा मुलगा मंदबुद्धीचा आहे. तो तिकडे कसा गेला हेच समजत नाही. मात्र, तो कोणत्याही धावत्या गाडीला लटकत होता. मला सात मुले-मुली आहेत. त्यात जुगराज चौथ्या क्रमांकाचा मुलगा. तो १६ वर्षांचा असताना वेडा झाला. कोणाच्याही पाठीमागे धावत सुटत होता. वाहनांना लटकत असायचा. एकेदिवशी तर तो कोटाला गेला होता. तेथे चौकात असलेल्या पुतळ्यावर जाऊन बसला, असे त्याची आई पानाबाई सांगायची. 

 

- पाकिस्तानातून आलेल्या कागदपत्रांत जुगराज अटारी सीमेवरून पाकिस्तानात आला. अटारी.. बुंदीपासून सुमारे ९०० किमी दूर आहे.  
जुगराज ट्रॅक्टरवर बसून पाकिस्तानात आल्याचे सांगण्यात येते. त्याने सीमा कधी व कशी ओलांडली याचा ठोस माहिती उपलब्ध नाही.  
- अटारीहून पाकिस्तानात आल्यानंतर तो लाहोर, मग बेगमकोट, त्यानंतर गुजरांवाला येथे गेला.  
- पाकिस्तानी सूत्रानुसार, झेलम एक्स्प्रेसमधून तो विनातिकीट प्रवास करताना पकडला गेला. लाहोरमध्ये सुफी दर्ग्याच्या दाता दरबारमध्ये उतरला होता. पैसे नसल्याने तो अन्यत्र कोठे गेला नाही.  
- जुगराजची शिक्षा २०१४ मध्ये पूर्ण झाली. जानेवारी २०१५ मध्ये त्याला कौन्सिलर असेस देण्यात आले. कोणत्याही व्यक्तीला परदेशात पकडण्यात आल्यानंतर त्याचे नागरिकत्व तपासण्यासाठीची प्रक्रिया  कौन्सिलर असेस म्हटली जाते. याअंतर्गत परदेशात पकडण्यात आलेल्या व्यक्तीला त्याच्या देशात परत पाठवताना कौन्सिलर त्या संबंधित कैद्याचा पत्ता प्रतिज्ञापत्रावर देतात.  
- जुगराज व गजानंद भारतीय असल्याची पुष्टी झाली आहे. केंद्र सरकारला अहवाल पाठवण्यात अाला आहे. आता केंद्र हा अहवाल पाकिस्तानला सुपूर्द करेल. त्यानंतरच जुगराज भारतात परत येऊ शकेल.  

 

गजानंद फॉरेनर्स अॅक्टनुसार अटकेत  
लाहोरच्या तुरुंगात असलेल्या जयपूरच्या गजानंदबाबत नवी माहिती हाती आली आहे. पाकिस्तानी दस्तऐवजानुसार, गजानंदच्या विरोधात परदेशी व्यक्तीसंदर्भातील कायद्यातील कलम १३ व १४ नुसार खटला दाखल करण्यात आला होता. यात त्याने जानेवारी-मार्च २०१६ दरम्यान दोन महिन्यांची शिक्षा झाली. गजानंद पाकिस्तानात गेला कसा, हे स्पष्ट झालेले नाही.

 

बातम्या आणखी आहेत...