आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषावरही बलात्कार होऊ शकतो? वाचा- तरुणाने सांगितलेली आपबीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच तारुण्यात आलेला मुलगा मित्राला भेटायला त्याच्या घरी जातो. मित्र घरी नसतो, पण बाहेर उभ्या असलेल्या शेजारच्या काकू त्याला मित्र येईपर्यंत वाट पाहण्यासाठी घरात नेतात. तो त्यांच्यासह घरात जातो. पण येथे त्याला वेगळाच अनुभव येतो. त्याच्यापेक्षा कितीतरी वर्षांनी मोठी असणारी महिला त्याच्यावर शरीरसुखासाठी दबाव टाकते. तसे न केल्यास त्याला पोलिसांना कळवण्याची धमकी देते.

>भ्यायलेला तरुण अत्याचारानंतर न्यायासाठी पोलिसांत धाव घेतो, पण तेथे उलटच घडते. न्यायाऐवजी त्याचे सर्वांसमोर हसे होते. वास्तविक, अशाच रेप पीडित तरुणांच्या वेदना मांडणारा हा व्हिडिओ प्रबोधनासाठी एका यूट्यूब चॅनलने बनवला आहे.
>कायद्यासाठी सर्वजण समान आहेत, मग तो श्रीमंत असो वा गरीब, पुरुष असो वा स्त्री! परंतु, समाजातील काही बाबी अशा असतात ज्या उजेडात येत नाहीत, आल्या तरी त्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. 
> अशाच एका पीडित तरुणाबाबत माहिती देतो हा व्हिडिओ. त्याच्यावर वयाने मोठ्या असलेल्या महिलेने रेप केलेला असतो. हा तरुण जेव्हा आपल्यासोबत झालेल्या दुष्कर्माची तक्रार घेऊन पोलिसांत जातो तेव्हा त्याला अनपेक्षित अनुभव येतो. त्याची हकिगत ऐकून सर्वजण त्याच्यावर हसायला लागतात. एवढेच काय, तरुणाचे मित्र, कुटुंबीयही असे काही घडल्याचे मानायला तयार नसतात. 
- Zero Budget Talkies ने हा व्हिडिओ अशाच घटनांचे बळी ठरलेल्या मुलांच्या वेदना मांडण्यासाठी बनवला आहे. दुष्कर्म तर घडले पण दाद मागायची कुठे हाच प्रश्न तरुणासमोर उभा ठाकलाय. या व्हिडिओच्या माध्यमातून निर्मात्यांनी समाज प्रबोधनाचा प्रयत्न केला आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफिकमधून पाहा, तरुणावर घडलेल्या अत्याचाराची हकिगत... शेवटच्या स्लाइडवर पाहा संपूर्ण शॉर्टफिल्म

बातम्या आणखी आहेत...