आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिच्यावर शाळेत मनापासून केलं प्रेम, नंतर जेव्हा तीच समोर आली...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालाय तस्मै नम: या उक्तीचा प्रत्यय प्रत्येकालाच येतो. काळ हा प्रत्येक बाबीवर औषध आहे, जखमेवरची फुंकर आहे... काळाबरोबर अनेक गोष्टी विस्मृतीत जातात, पण विसरत नाही ते प्रेम. मग ते अबोध बालकाचे असो किंवा परिपक्व युवक-युवतीचे, ते पक्के आणि तितकेच सच्चे असते.
> या प्रेमाच्या भावनेत आपुलकी, स्नेह, वात्सल्याचा ओलावा झिरपत असतो. यामुळे प्रेमाची पाळेमुळे आणखी घट्टच होत असतात. याच प्रेमाचा आविष्कार कधी कुणाला शाळेत असताना होतो, तर कधी ऐन तारुण्यात कॉलेजच्या कट्ट्यावर...
> पहिले प्रेम विसरत नसते असे म्हणतात. प्रेमाला ना वयाचे बंधन ना समाजाचे. असाच एक मुलगा लहानपणी शाळेत ज्या शिक्षकेतवर अतोनात प्रेम करत असतो काही काळानंतर तीच अचानक जेव्हा त्याच्यासमोर येऊन उभी राहते, तेव्हा त्याच्या मनात भावभावनांचा जो गोंधळ उडतो तो या कथानकातून टिपण्यात आला आहे.
> त्याला घडवण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी जी शिक्षिका मेहनत घेते तिचे पांग तो डॉक्टर होऊन कसे फेडतो, हे या कहाणीतून दाखवण्यात आले आहे... हमारा मूव्हीजने Time नावाची ही शॉर्टफिल्म बनवली आहे. यातून सुंदर अन् निर्व्याज प्रेमाची माहिती देण्यात आली आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिक्स मधून Time चे कथानक, शेवटी पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...