आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा शेजारणीचा बळजबरी धरला होता हात, दिले होते वचन; अशी आहे नवाजुद्दीनची इन्स्पायरिंग जर्नी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ - यूपीच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील मूळच्या बुढाना गावातील अॅक्टर नवाजुद्दीन सिद्दिकीने सध्या आपल्या अॅक्टिंगने धूम केलेली आहे. लीड अॅक्टर म्हणून त्याचा आणखी एक चित्रपट 'मॅकमाफिया'चा फर्स्ट लूक जारी झाला. एका छोट्या शहरातून निघून मेनस्ट्रीम सिनेमात झळकण्यापर्यंतचा प्रवास खूप इन्स्पायरिंग आहे. DivyaMarathi.Com त्यांच्या या प्रवासाशी निगडित काही मजेदार किस्से आपल्या वाचकांना सांगत आहे. 

 

जेव्हा गर्लफ्रेंडसमोर रडू लागला नवाज 
- नवाजुद्दीनने DivyaMarathi.Com ला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये आयुष्यातील काही घटना शेअर केल्या होत्या. जुन्या प्रेमप्रकरणाचा एक किस्सा ऐकवताना ते म्हणाले, "तेव्हा मी दिल्लीच्या एनएसडीमध्ये शिकत होतो. तेथे सर्व बॅचमेट्सना गर्लफ्रेंड होती, अपवाद फक्त मी. मग मीही एका तरुणीशी मैत्री केली."
- "एकदा मी तिच्यासोबत पार्कमध्ये फिरायला गेलो होतो. तेथे मी तिचा हात पकडला, तर ती मला रागावली.  यामुळे माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला इमोशनल झालेले पाहून ती म्हणाली, एखाद्याला टच करण्याआधी परमिशन घेतली पाहिजे. असे म्हणून तिने मला आलिंगन दिले होते."
- नवाजुद्दीनने सांगितले की, माझा हाच रिअल लाइफ किस्सा गँग्ज ऑफ वासेपूर-2 मध्ये चित्रित करण्यात आला होता. 

 

सिनेमात मार खायचा नवाजुद्दीन, रागवायचे वडील...

- नवाजुद्दीनने सांगितले, "सरफरोशनंतर मला छोटे छोटे रोल मिळणे सुरू झाले. माझे अब्बा एकच तक्रार करायचे, मी प्रत्येक चित्रपटात मार खातो. ते मला म्हणायचे - हमेशा मार खातोस, कधी तूही मार. यामुळे मला खूप फ्रस्ट्रेशन व्हायचे."
- आता नवाजुद्दीनचा प्रयत्न असेच रोल मिळवण्याचा असतो ज्यात तो इतरांना मारू शकेल. नवाजुद्दीन सांगतो, "मी असे रोल करून अब्बांना दाखवणार आहे की, मीही मारू शकतो." 

 

लाजाळू नवाजुद्दीनने नाही केले पत्नीला KISS
- नवाजुद्दीनने आपल्या पर्सनल लाइफशी निगडित काही गोष्टीही शेअर केल्या.
- चर्चेत राहिलेल्या पहिल्या ऑनस्क्रीन किसवर तो म्हणाला, "मिस लव्हलीच्या शूटिंगदरम्यान मला को-स्टार निहारिकाला लिप किस करावे लागले. माझ्यासाठी तो सीन खूप कठीण होता. मी कधीच आपल्या पत्नीलाही असे किस केले नव्हते."
- तथापि, नवाजुद्दीनचे लग्न खूप कमी वयात झाले होते. तेव्हा तो फिल्म इंडस्ट्रीत स्ट्रगल करत होता. त्याची पत्नी अंजली सिद्दिकी त्याच गावातील रहिवासी आहे. नवाजुद्दीन एक मुलगी आणि एका मुलाचे वडील आहेत.

 

पुढच्या स्लाइड्वर पाहा, नवाजुद्दीनने बालपणीच्या प्रेमाखातर टीव्हीवर झळकण्याचे स्वप्न कसे पूर्ण केले...  

बातम्या आणखी आहेत...