आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद - बलुचिस्तानातील कार्यकर्ते कदीर बलोच यांनी कुलभूषण जाधव हे कधीही पाकिस्तानात शिरलेच नव्हते असा दावा केला आहे. इराणी मौलवी मुल्ला उमर बलोची ईराणीने त्यांचे अपहरण करून सुमारे 5 कोटीत त्यांना विकले होते, असेही बलोच म्हणाले. कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. पाकने त्यांना मृत्यूदंड सुनावला आहे. पण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस (ICJ) ने त्यावर स्थगिती लावली आहे. 25 डिसेंबरला कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी त्यांना भेटयला पोहोचली होती. त्यावेळी पाक अधिकाऱ्यांनी त्यांच्यात काचेची भिंत उभी केली होती.
पुराव्यांशिवायच जाधवला ठरवले दोषी
- कदीर यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीच्या हवाल्याने पाकिस्तानी वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने म्हटले आहे की, जाधव यांना इराणमधून किडनॅप केले होते. त्यांना काहीही पुरावे न देता मृत्यूदंड सुनावण्यात आला. पण जाधव कधी पाकिस्तानात घुसलेच नाही.
- चॅनलने दावा केला आहे की, जाधव यांना जैश-उल-अद्ल ग्रुपने ईराणच्या सरबाजमधील गोल्डश्मिट बॉर्डरजवळून कि़नॅप केले होते. ही बॉर्डर चाबहार पासून 52 किलोमीटरवर आहे. जैश-उल-अद्लला पाक आर्मी पैसे देते.
- रिपोर्ट्सनुसार, जाधव यांना सरबाज येथे एका बिझनेस ग्रुपने बोलावले होते. हा बिझनेस ग्रुप जैश-उल-अद्लसाठी काम करतो. मुल्ला उमर ईराणी जैशसाठीही काम करतो.
- चॅनलने हा दावाही केला आहे की, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कदीर बलोचची मुलाखत मागवली आहे.
- जाधव इंडियन नेव्हीचे अधिकारी होते. त्यांना 2016 मध्ये बलुचिस्तानातून अटक करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
- पाक आर्मीचा दावा आहे की, जाधव भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) साठी हेरगिरी करत होते. त्यांना बलुचिस्तानातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानी आर्मीच्या फिल्ड जनरल कोर्ट मार्शल (FGCM) ने एप्रिलमध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
- इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसने 18 मे 2017 मध्ये त्यांच्या फाशीवर स्थगिती लावली होती. पाकिस्तानला काही अटींची पूर्तताही करायला सांगितले होते.
भारताचे म्हणणे काय?
भारताचे म्हणणे आहे की, जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले होते. इंडियन नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर ते ईराणमध्ये व्यवसाय करत होते. पण पाकिस्तानच्या दाव्यानुसार त्यांना बलुचिस्तानातून 3 मार्च 2016 ला अटक करण्यात आली होती. पाकिस्तानने जाधव यांच्यावर बलुचिस्तानात अशांती पसरवल्याचा आणि हेरगिरीचा आरोप लावला आहे.
जाधव यांच्या आई आणि पत्नीने जेव्हा पाकिस्तानात त्यांची भेट घेतली तेव्हा पाकिस्तानने त्यांच्याबरोबर कसे वर्तन केले आणि मीडियाने कसा त्यांचा छळ केला वाचा पुढील स्लाइड्सवर..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.