आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगाली अभिनेत्री मौमिता साहा हिचा राहत्या घरी छताला लटकलेल्या आढळला मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- पश्चिम बंगालची राजधानी कोलकातातील रिजेंट पार्क भागात 23 वर्षीय टीव्ही अॅक्ट्रेस मौमिता साहा हिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मौमिताचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे.

 

मौमिताच्या फ्लॅट शेजारी राहाणार्‍या लोकांना पोलिसांना फोन करून ही‍ माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मौमिताचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

 

सूत्रांनुसार, मौमिता ही मागील दोन महिन्यांपासून फ्लॅटमध्ये एकटी राहात होती. फ्लॅटमधून पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे. मौमिता दोन दिवसांपासून फ्लॅट बाहेर निघाली नव्हती, अशी माहिती मौमिताच्या घरमालकाने दिली आहे.

 

मौमिताने आत्महत्या का केली असावी, याचा पोलिस तपास करत आहे. मागील काही दिवसांपासून ती तणावग्रस्त होती, असे तिच्या फेसबुकवरील पोस्ट पाहिल्यानंतर पो‍लिसांनी सांगितले आहे. मौमिताचे मोबाइल कॉल डिटेल्‍स तपासत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... मौमिता साहा हिचे काही फोटो..

बातम्या आणखी आहेत...