Home | National | Other State | bjp come out as largest party in karnataka election

कॉल सेंटर ते 50 हजार केंद्र: कर्नाटकमध्‍ये मायक्रो मॅनेजमेंटद्वारे भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष

संतोषकुमार | Update - May 16, 2018, 06:43 AM IST

कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप मायक्रो मॅनेजमेंटद्वारे आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचला आहे.

 • bjp come out as largest party in karnataka election

  बंगळुरू - कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप मायक्रो मॅनेजमेंटद्वारे आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचला आहे. असे असले तरी काट्याच्या लढतीत हा पक्ष बहुमतापासून दूरच राहिला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मोदी मंत्रिमंडळातील ३० केंद्रीय मंत्र्यांसह ५५ खासदारांवर कर्नाटकातील चार-चार मतदारसंघांची जबाबदारी सोपवली होती.

  यानंतर ही संख्या कमी करून एकीकृत व्यवस्था लागू केली. भाजपने पान प्रमुखासोबत पहिल्यांदा पान समिती स्थापन केली. त्यात मतदार यादीतील त्या पानातील २-३ मतदारांना आपल्यासोबत जोडले. अशा पद्धतीने विधानसभेत पक्षाने १५ ते २२ हजार पान कार्यकर्त्यांची फौज उभी केली व १० लाखांहून जास्त मतदारांना पक्षाशी जोडले. भाजपच्या या विजयात प्रचाराची रणनीती महत्त्वाची ठरली. पक्षाने महिला, युवा, शेतकरी, दलित, अल्पसंख्याकांसह सर्व ८ आघाड्या सक्रिय करत प्रत्येक गावात जनसंपर्काची जबाबदारी सोपवली. म्हणजे एका दिवसात एका गावात एका तासाच्या आत जनसंपर्क मोहीम चालवली.

  एका दिवशी ८ वेळा जनसंपर्काच्या धोरणामुळे भाजप लढतीत वरचढ ठरला. याशिवाय मिस्ड कॉलने पक्षाचे सदस्य झालेल्या नागरिकांना कॉल सेंटरद्वारे थेट संपर्क साधला. ज्या मतदारांशी फोनवर बोलणे शक्य नव्हते त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कासाठी १०-१० लोकांची व्हेरिफिकेशन टीम तयार केली होती. प्रत्येक मतदारसंघात अशी व्यवस्था केली होती. जवळपास ५०-५५ हजार मतदान केंद्रे तीन भागांत- बूथ कमिटी, शक्ती केंद्र, महाशक्ती केंद्रात विभागण्यात आली. प्रत्येक केंद्रावर ५ ते ७ जणांची समिती स्थापन केली. ५-७ केंद्रे मिळून एक शक्ती केंद्र व ५ शक्ती केंद्रे मिळून एक महाशक्ती केंद्र स्थापन केले. प्रदेश भाजपला केवळ प्रचार मोहिमेत ठेवले. सर्व्हेणातूनच शहांनी उमेदवार निवडले.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, जिथे मोदींनी राहुल गांधींना १५ मिनिटांचे आव्हान दिले, फेअरवेलचे आवाहन केले तिथे ९९% विजय...

  हेही वाचा,
  भाजपची मध्य आणि मुंबई कर्नाटकात पकड मजबूत; जेडीएसचा बालेकिल्ला मात्र शाबूत

  कर्नाटक निवडणूक: ज्‍या उमेदवारांची सर्वाधिक चर्चा झाली, वाचा त्‍यांचे काय झाले

 • bjp come out as largest party in karnataka election
 • bjp come out as largest party in karnataka election
 • bjp come out as largest party in karnataka election
 • bjp come out as largest party in karnataka election
 • bjp come out as largest party in karnataka election
 • bjp come out as largest party in karnataka election
 • bjp come out as largest party in karnataka election

  पुढील स्‍लाइडवर वाचा, सोशल मिडीयावरील विनोदी प्रतिक्रिया...

 • bjp come out as largest party in karnataka election

  - कर्नाटक निवडणुकीत राहुल तासनतास बोलले. मात्र, त्यांचा पक्ष उभा राहिला नाही.
  - अशाच मोठमोठ्या कंपन्या बुडत नाहीत. काहींचे मॅनेजर राहुल गांधी असतात.

  - ताजा कलम... कर्नाटकचे कल येताच राहुल गांधींनी पंतप्रधानपदातून माघार घेतली आणि ते परदेशात जाण्यासाठी तिकीट घेताना दिसले. 

  - तुम्ही भाजपच्या जागांत सीबीआय व अंमलबजावणी संचालनालयाच्या जागा जोडल्यास तुम्हाला कळेल की जेडीएस कोणासोबत सरकार स्थापन करेल. 

 • bjp come out as largest party in karnataka election

  मतमाेजणी सुरू हाेताच काँग्रेससाेबत माेठी गुगली, सिद्धरामय्या यांच्या कार्यालयाला कुलूप

   

  प्रारंभीच्या मतमाेजणीपूर्व सर्वेक्षणांत भाजपला बहुमत मिळत असल्याचे दिसून येत हाेते. काँग्रेसचा पराभव हाेण्याची चाहूल लागताच राजधानी बंगळुरूतील सचिवालयाचे एक छायाचित्र समाेर अाले. त्यात सचिवालयाचा कर्मचारी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या कार्यालयाला कुलूप लावताना दिसत अाहे. तथापि, दुपारनंतर भाजपची स्थिती पाहून सिद्धरामय्या पुन्हा सक्रिय झाले.

Trending