आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडेटवर गेलेली एक तरुणी मित्राबरोबर दारु प्यायली. त्यानंतर ती एवढी मद्यधुंद झाली की पुढे काय झाले ते तिला कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी तिला बलात्कार झाल्याचे कळले. पण तो बलात्कार होता की नाही, या संभ्रमात ती कायम राहिली...कारण हा प्रकार झाला तेव्हा तिच्याप्रमाणे तिचा मित्रही मद्यधुंद होता. त्यामुळे या प्रकारानंतर अनेकदिवस तिच्या मनात विचारांचा गुंता होता. अखेर तिने या विषयावर मौन सोडले आणि सर्वांसमोर मन मोकळे केले...
एका तरुणीने तिच्याबरोबर झालेला प्रकार तिच्याच शब्दांत सांगितला आणि इतरांना काही सल्लेही दिले...ते पुढील प्रमाणे...
कडाक्याची थंडी असलेल्या एका रात्री सुमारे दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2013 मध्ये मला माझ्या जीवनातील सर्वात वाईट आणि भीतीदायक अनुभवाला सामोरे जावे लागले. त्यावेळी असे काही होईल याची मला काडीमात्रही कल्पना नव्हती. पण ते सर्व मी आयुष्यभर विसरू शकणार नाही, हेहे तेवढेच खरे. लैंगिक अत्याचार बलात्कारामुळे माझी प्रतिमा आणि माझा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर ढासळला. माझे सर्वस्व किंवा माझी संपत्तीच माझ्याकडून हिसकावून घेतली होती. तीही अशा व्यक्तीने ज्यावर मी आधी खूप विश्वास करत होते. त्याने माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि माझ्याबरोबर दुष्कृत्य केले.
या प्रकारानंतर मी अनेकप्रकारच्या भावनांचा अनुभव घेतला. माझ्याकडे केले जाणारे दुर्लक्ष, राग, दुःख अशा विविध भावनांचा डोंगर माझ्या मनात साचलेला असायचा. पण आता मी स्वतःवर सर्वात जास्त प्रेम करते. यापूर्वी कधीही केले नसेल एवढे. तरीही या वाईट अनुभवाचे ओझे कायम मनावर असते. लोक कशाचाही विचार न करता एखाद्याला उध्वस्त कसे करू शकतात हा विचारही घरात मन करून बसलाय तोही कायमचाच.
याठिकाणी मला माझी कथा शेअर करायची आहे. त्याची काही कारणेही आहेत. कशाप्रकारे एका मोठ्या संस्थेमध्ये माझ्यावर बलात्कार झाला त्याचे चित्र मला सर्वांसमोर मांडायचे आहे. अशा प्रकारच्या अनुभवाला सामोरे जाणाऱ्या सर्वांना हे सांगण्यासाठी की ते एकटे नाहीत आणि केवळ त्यांना संपूर्ण दोष दिला जाणे चुकीचे आहे, हे सर्वांच्या लक्षात यावे म्हणून मी तसे करणार आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, तरुणीची संपूर्ण कथा आणि तिने दिलेले काही मोलाचे सल्ले...
टिप- या तरुणीने मांडलेले मनोगत एका इंग्रजी वेबसाईटवर प्रकाशित झाले आहेत...या तरुणीची कथा परदेशातील असली तरी आपल्याही देशात हळू हळू पार्टी कल्चर रुजत आहे... त्यामुळे तरुणांनी यातून योग्य तो धडा घ्यावा या उद्देशाने हे मनोगत याठिकाणी देत आहोत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.