आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ष 2017 संपत आहे. या वर्षाने अनेक सुखद आठवणी दिल्या, तितक्याच क्रूर, अमानुष घटनाही घडल्या. एवढ्या निर्घृण घटना या वर्षात घडल्या ज्यांनी देशभरात खळबळ उडवून दिली. अशाच काही घटनांचा हा फ्लॅशबॅक...
नवगछिया (भागलपूर) - सख्ख्या दिराने आपल्या भावजयीवर बळजबरी केली होती. पीडितेने याचा विरोध केल्यावर त्याने देशी पिस्तुलातून महिलेला जबड्याजवळ गोळी मारली होती. कुटुंबीयांनी उपचारांसाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे प्रकृती आणखी ढासळल्याने तिला मोठ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. तेथेच तिचा मृत्यू झाला होता.
घरात एकटेचे होते दीर-भावजयी...
- घटनेनंतर डीएसपी मुकुल कुमार रंजन, पोलिस स्टेशन अध्यक्ष संजय कुमार सुधांशु व इतर घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी दिराला अटक केली होती.
- दरम्यान, पोलिसांनी खुनात वापरलेला देशी पिस्तूल शोधून हस्तगत केले होते.
चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
- मृत पूनमचे लग्न चार महिन्यांपूर्वीच झाले होते. तिचा पती एका हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजी लॅब चालवतो.
- घटनेच्या वेळी तो आपल्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये होता. माहिती मिळताच घरी गेल्यावर त्याला पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. यानंतर त्याने लगेच उपचारांसाठी तिला रुग्णालयात दाखल केले होते.
घटनेच्या वेळी दोघेच होते घरात
- ज्या वेळी हा खून झाला, तेव्हा पूनम आणि तिचा दीर कृष्णा हे दोघेच घरात होते. दसऱ्यामध्ये पूनमचा भाऊ 12 वर्षीय रौनक कुमार बहिणीसह आलेला होता.
- रौनकने सांगितले की, घराच्या एका खोलीत माझी बहीण झोपलेली होती. दुसऱ्या खोलीत कृष्णा झोपलेला होता. मी आणि भावजीची बहीण मधू जुन्या घरात टीव्ही पाहत होतो.
- दुपारी दोन वाजता कृष्णाने पिस्तूल झाडली. यानंतर पूनमला दवाखान्यात नेण्यात आले होते.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.