आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तू मेला तर शाळेला सुट्टी मिळेल', जखमी विद्यार्थ्याने सांगितले दीदीने कसा केला त्याच्यावर हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - येथील ब्राइटलँड शाळेत मंगळवारी एका मुलावर चाकू हल्ला झाला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याने गुरुवारील पोलिसांसमोर जबाब दिला. त्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार शाळेतील एका मोठ्या मुलीनेच त्याच्यावर चाकू हल्ला केला होता. 7 वर्षांच्या या विद्यार्थ्याने जबाबात पोलिसांना सांगितले की, 'दीदी मला मारत होती, तेव्हा ती म्हणाली जर तू मेलास तर शाळेला सुट्टी मिळेल. या प्रकरणी आम्ही मानसोपचार तज्ज्ञांशी बोलून त्या मुलीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

 

काय म्हणाले मानसोपचार तज्ज्ञ.. 
- नॅशनल पीजी कॉलेजच्या असिस्टंट प्रोफेसर डॉ. नेहाश्री श्रीवास्तव म्हणाल्या की, हा एक मानसिक आजार आहे. त्यामुलीमध्ये रागाचे प्रमाण खूप जास्त असेल. पालकांच्या बेजबाबदारपणामुळे हा राग वाढत जातो. अशी मुले फिजिकली फिट असतात, पण ते स्वतःच्या आनंदासाठी एखाद्याला हानी पोहोचवायलाही मागेपुढे पाहत नाहीत. 
- त्या 11 वर्षाच्या मुलीने सुट्टीसाठी 7 वर्षाच्या मुलाला चाकू मारला. चाकू मारल्याने वेदना होतील आणि रक्त निघेल हे तिला माहिती होते. ज्या घरांमध्ये आई वडील मुलांसमोर भांडतात त्या मुलांमध्ये असे प्रकार पाहायला मिळतात. सर्व आई वडिलांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, कशी घडली ही संपूर्ण घटना.. हल्ला केलेली मुलगी दोन वेळा पळून गेली होती घरातून...

 

बातम्या आणखी आहेत...