आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्यांदा सदनात जाणार जया बच्चन, हे आहेत त्यांचे संसदेत गाजलेले डायलॉग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - जया बच्चन सलग चौथ्या वेळा संसदेत जाण्याची तयारी करत आहेत. त्यांनी राज्यसभा मेंबर बनण्यासाठी सपाच्या पाठिंब्याने नॉमिनेशन फाइल केले आहे. जया बॉलीवूडच्या अशा निवडक हस्तींपैकी आहेत ज्यांनी सिनेजगतासोबतच पॉलिटिक्समध्येही कमाल केली आहे. रुपेरी पडद्यावरील त्यांचे डायलॉग जसे ट्रेंड बनायचे, काहीशा त्याच प्रकारे राज्यसभेत क्राइम अगेन्स्ट वुमेन यासारख्या गंभीर मुद्द्यांवर त्यांनी आपल्या दमदार शैलीत आपली बाजू मांडली. मग ते वाढलेले रेप केस असो किंवा घरगुती हिंसाचार, प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी नेहमी कणखरपणे आपली बाजू मांडली आहे.

DivyaMarathi.Com आपल्या वाचकांना या दमदार अभिनेत्री,  नेत्याचे असे डायलॉग सांगत आहे, ज्यामुळे संसदेत त्यांचे कौतुक झाले.

 

चौथ्यांदा राज्यसभा निवडणूक लढणार जया बच्चन
- जया बच्चनने चौथ्यांदा राज्यसभा निवडणुकीसाठी फॉर्म भरला आहे. त्या सन 2004 पासून सलग राज्यभा सदस्य आहेत. त्यांचा सध्याचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे.
- 23 मार्च रोजी 58 राज्यसभा जागांवर निवडणुका होतील. यात अरुण जेटली, रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावड़ेकर असे दिग्गज नेते सामील आहेत.

 

पत्रकार होते जया यांचे वडील...
- जया बच्चन यांचे वडील तरुण कुमार भादुड़ी कोलकाताच्या एका वृत्तपत्रात पत्रकार होते. ते भोपाळला त्या वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी बनून आले होते.
- अर्जुन सिंह यांच्या सरकारमध्ये तरुण भादुडी एमपी टूरिझम कॉर्पोरेशनचे चेयरपर्सनही राहिले.
- जया बच्चन यांचे शालेय शिक्षण भोपाळच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमधून झाले. इंटरमीडिएटनंतर त्यांनी पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पदवी घेतली.
- ब्यूरोक्रेटिक बॅकग्राउंडमुळे जया बच्चन यांनी राजकारणातही आपली भूमिका उत्तम वठवली. समाजवादी पार्टीच्या नेत्या म्हणून त्यांनी स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या हिंसेच्या मुद्द्याला संसदेत आवाज दिला. 


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, जया बच्चन यांचे संसदेत गाजलेले डायलॉग्ज...

बातम्या आणखी आहेत...