आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Male Female Cheating Their Partners Using Dating Sites Life Is Short Have An Affair

अलर्ट: विवाहेतर संबंधांसाठी आहे हे अॅप, तुमच्या जोडीदाराच्या फोनमध्ये तर नाही ना !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लग्न केलेले असूनही नव्या प्रेमाचा शोध घेणाऱ्यांची इच्छा पूर्ण करते जगातील (कु) प्रसिद्ध डेटिंग साइट अॅशले मेडिसन. या साइटचे मेंबर बनून लाखो लोकांनी आपली (आंबट) इच्छा पूर्ण केली आहे. या मेंबर्समध्ये भारतातील लोकांचा आकडा चकित करणारा आहे. 2015च्या आकडेवारीनुसार भारतातील 2 कोटी युजर्स या वेबसाइट व अॅपचा वापर करतात. तथापि, या आकडेवारीत आता कित्येक पटींनी वाढ झालेली आहे.   

 

काय आहे अॅश्ले मेडिसन?
>Ashley Madison कॅनडाची एक ऑनलाइन डेटिंग सर्व्हिस आहे. खासकरून लग्न झालेल्या पण असमाधानी स्त्री-पुरुषांना लक्षात ठेवून हिची निर्मिती करण्यात आलेली आहे.

 > या साइटचे स्लोगनच मुळी "Life is short. Have an affair" असे आहे.  2001 मध्ये लाँच झालेल्या या वेबसाइटवर लॉगिन बिलकुल फ्री आहे. पैसे फक्त तेव्हाच द्यावे लागतात, जेव्हा एखादा पुरुष वा स्त्री मेंबर एखाद्याला मेसेज करतो.
> 2014 मध्ये भारतात ही वेबसाइट अधिकृतरीत्या लाँच झाली. आणि अवघ्या काही महिन्यांत याचे तब्बल 2 कोटींहून अधिक भारतीय सदस्य बनले.
> ही वेबसाइट नव्या पार्टनरचा शोध घेणाऱ्यांसाठी सेफ असल्याचे सांगितले जाते, कारण या वेबसाइटवर प्रत्येक सेवेसाठी किंमत चुकवावी लागते. 

 

अफेअरसाठी भारतीयांनी खर्च केले कोट्यवधी... 
> मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीयांनी या वेबसाइट कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. या वेबसाइटचे ग्राहक बहुतांश करून हायप्रोफाइल आहेत, परंतु इंटरनेटची व्याप्ती वाढत असताना आता मध्यमवर्गीयही यात मेंबर होत आहेत. एका रिपोर्टनुसार, या साइटवर पैसा खर्च करणाऱ्यांत सर्वाधिक संख्या मेट्रो शहरातील लोकांची आहे.

 

2015 मध्ये झाली होती हॅक
> वेबसाइट 2015 मध्ये हॅक झाल्याने चर्चेत आली होती. तेव्हा काही हॅकर्सनी यावरील सर्व डेटा (ईमेल्स, घराचा अॅड्रेस, युजर्सची सेक्शुअल फँटसी, क्रेडिट कार्ड इन्फॉर्मेशन इ. माहिती) चोरली आणि ही वेबसाइट बंद न केल्यास ती जगजाहीर करण्याची धमकी दिली होती.
> हॅकर्सनी यातील काही डेटा 18 ऑगस्ट 2015 रोजी पोस्टही केला होता. यानंतर कंपनीचे फाउंडर आणि सीईओ नोएल बिडरमन यांनी राजीनामा दिला होता. दुसरीकडे, कंपनीने हॅकर्सची माहिती देणाऱ्याला 5 लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते.


अफेअरसाठी असे होतात पैसे खर्च...
> सर्वप्रथम या वेबसाइटवर युजरला रजिस्टर व्हावे लागते. हे मोफत आहे.
> यानंतर युजर आपल्या निक नेमने या वेबसाइटवर स्वत:ची प्रोफाइल बनवतो. काही युजर त्यांचे खरे नावही टाकतात. आपली प्रोफाइल तयार झाल्यानंतर युजर्स चॅट करण्यासाठी सज्ज असतात. 
> त्यांना इतर विरुद्ध लिंगी, समलिंगी युजर्सना चॅट वा मेसेज करण्यासाठी ठराविक रक्कम खर्च करावी लागते. ज्याचे पेमेंट ऑनलाइन पद्धतीने होते. 
> एकमेकांना मेसेजच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर पसंतीला आलेला युजर दुसऱ्याला स्वत:चे खरे फोटोज पाहण्याचा अॅक्सेसही देऊ शकतो. ही सेवा सशुल्क असल्याने यात फ्रॉड क्वचितच होतात. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ऑनलाइन डेटिंग साइटच्या विळख्यात कित्येक संसार येऊन उद्ध्वस्त झाले आहेत वा होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
> पती काही कारणाने परगावी जायचे सांगून या साइटवर आधीच ठरलेल्या एका तरुणीशी दुसऱ्या शहरात भेटतो. किंवा... विवाहित महिला घटकाभरासाठी बाहेर जायचे असल्याचे सांगून ठरलेल्या स्थळी युजरला भेटते, असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे आढळते.
> एका रिपोर्टनुसार, या वेबसाइटवर 'पार्टनर'चा शोध घेणाऱ्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या लक्षणीयरीत्या जास्त आहे.

 

लव्ह... सेक्स अन् धोका
> या वेबसाइटवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे पुरुष खोडसाळपणाने एखाद्या महिलेची बनावट प्रोफाइल बनवून टाकण्याचे प्रकारही घडले आहेत. अशा प्रकारामुळे कित्येकांना लाखोंचा गंडा घातला गेला आहे.
> चॅटिंग, मेसेजच्या माध्यमातून दुसऱ्या युजरला त्याची आयडेंटिटी जाहीर करायला लावली आणि ब्लॅकमेल करण्यात आले, असेही प्रकार वृत्तांमधून आलेले आहेत. एका वृत्तानुसार, ब्लॅकमेलिंग आणि पार्टनरशी आपली धोकेबाजी जाहीर झाल्याने युजर्सनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला होता.

 

संस्थापक स्वत: मात्र पार्टनरशी प्रामाणिक... 
> विवाहेतर संबंधांना प्रोत्साहन देणारी ही साइट 47 वर्षीय नोएल बिडरमन यांच्या डोक्यातील आयडियाची कल्पना आहे. ते एव्हिड लाइफ मीडियाचे सीईओ होते. याच कंपनीने 2001 मध्ये अॅश्ले मेडिसनची सुरुवात केली. 17 वर्षांपासून विवाहित आणि 2 मुलांचे वडील असलेले नोएल एका मुलाखतीत म्हणाले होते की, त्यांनी कधीही आपल्या पत्नीचा विश्वासघात केलेला नाही.

 

भारतीयांनी किती पैसा खर्च केला... 

वर्ष रक्कम रुपयांमध्ये
2008 198
2009 958
2010 2957
2011 4795
2012 8297
2013 1064688
2014 15663870
2015 7298610

(2015 पर्यंतची आकडेवारी)

 

कोणत्या शहरातून किती पैसे खर्च?

शहर रक्कम (लाख रुपयांत)
मुंबई 45
बंगळुरू 35
नवी दिल्ली 34
पुणे 16
चेन्नई 13
गुड़गांव 12
हैदराबाद 10
कोलकाता 6
अहमदाबाद 5
नोएडा 4

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, विवाहेतर संबंधांना प्रोत्साहन देणाऱ्या या ऑनलाइन साइटबाबत... 

बातम्या आणखी आहेत...