आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर मायावती यांचे पुन्हा प्रश्नचिन्ह;वाढदिवसानिमित्त पत्रकार परिषद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- बसप प्रमुख मायावती यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या विश्वासार्हतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून भाजप मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्यास का घाबरत असल्याचे म्हटले आहे. ईव्हीएमबाबत विविध पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकेबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांनी विचार करावा, असे मायावती म्हणाल्या.

  
भाजप नेते स्वत:ला प्रामाणिक समजत असतील तर ते भविष्यातील निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यास का घाबरतात, असे मायावती यांनी आपल्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. ईव्हीएम मशीनमधील बिघाडामुळे भाजप उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये निवडून आल्याचा आरोप त्यांनी केला. 


ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत चर्चा घडवून आणण्याची मागणी वर्षभरापासून सुरू आहे. काँग्रेससह अन्य पक्षांनी ईव्हीएममध्ये फेरफाराची शक्यता व्यक्त केलेली आहे. निवडणूक आयोगाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. डिसेंबरमधील गुजरात निवडणूक  मतमोजणीत निवडणूक आयाेगाने अधिक पारदर्शकता राखण्याचे प्रयत्न केले होते.

 

लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक शक्य  
मायावती यांनी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसह लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक होऊ शकते, असे भाकीत केले. त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या तेराव्या आवृत्तीचे प्रकाशन केले.उत्तर प्रदेश विधानसभा मतमोजणीनंतर ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करून सर्वाेच्च न्यायालयात धाव घेणारा बसप हा पहिला पक्ष होता. निवडणूक आयोगाने ईव्हीएममध्ये जे काही बदल केले त्यामागे बसपचे प्रयत्न आहेत, असा दावा त्यांनी केला.त्यांनी पंतप्रधान मोदी यंाच्यावर टीका केली.

बातम्या आणखी आहेत...