आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदीसाठी घरातून निघालेल्या तरुणीला बळजबरी ऑटोत बसवले, हॉटेलमध्ये नेऊन गँगरेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गया (बिहार) - शहरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला किडनॅप करून तिच्यावर गँगरेपचे प्रकरण समोर आले आहे. 24 जानेवारी रोजी संध्याकाळी मुलगी खरेदीसाठी घरातून निघाली होती. याप्रकरणी पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी छापेमारी करून हॉटेलमधून आरोपी गणेशला अटक केली आहे. त्याची चौकशी झाल्यावर साथीदार ऑटोचालक आलोकलाही अरेस्ट करण्यात आले.

 

कुटुंबीयांचा आरोप- मेडिकलसाठी तिसऱ्या दिवशी का पाठवले?
- पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पीडितेची काकू म्हणाली की, 25 जानेवारीला तक्रार दिल्यावर  पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडले, परंतु गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ करू लागले होते.
- मेडिकलही केले नाही, परंतु 27 ला माध्यमांनी दखल दिल्यावर पीडितेला मेडिकलसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. 
- दुसरीकडे, पोलिस अधिकारी हरि ओझा म्हणाले की, पीडितेला बहाण्याने नेऊन दोन्ही आरोपींनी गँगरेप केला आहे.

 

पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
- मुलीला किडनॅप करून गँगरेप केला जातो. पोलिस दोन तरुणांना घटनेच्या खुलाशानंतर 25 तारखेलाच अटक करतात.
- यानंतर त्यांना ना तुरंगात डांबले जाते, ना एफआयआर दाखल केली जाते. पोलिस कशाची वाट पाहत होते?  
- याला वाट पाहणेच म्हणतात, तब्बल 72 तासांची प्रतीक्षा. 24 तारखेला दुष्कर्म, त्या दिवशीच्या खुलाशानंतर तीन दिवसांनी 27 तारखेला एफआईआर दाखल आणि मग कुठे मुलीला मेडिकलसाठी पाठवणे, हा सर्व प्रकार पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाराच आहे.

 

एका आमदाराचा येत होता फोन
- पीडितेच्या कुटुंबाचा आरोप आहे की, एक आमदार पोलिसांवर आरोपींना सोडण्यासाठी दबाव टाकत होता. पोलिसांना यासाठी अनेक वेळा फोन आले.
- कुटुंबाच्या मते, मीडियावाले आले नसते तर 27 तारखेलाही केस दाखल झाली नसती.

 

पुढच्या स्लाइड्सवर, इन्फोग्राफिक्समधून पाहा पूर्ण प्रकरण...

बातम्या आणखी आहेत...