आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआग्रा - 11 जानेवारी रोजी शाळेसाठी निघालेल्या बेपत्ता मुलींना पोलिसांनी एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. मुलींनी आपल्या वडिलांची कडक शिस्त आणि पुढे शिकू देत नसल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, आपल्या घरच्यांसोबत राहायलाही त्यांनी साफ नकार दिला आहे. मुलींनी पोलिसांसमोर रडत-रडत म्हटले की, ''पप्पा, पुन्हा तसेच करतील, ते शिकू देणार नाहीत. म्हणून आम्हाला घरी जायचे नाही.'' सध्या, पोलिसांनी मुलींना नारी निकेतनमध्ये ठेवले आहे.
मुलींपर्यंत असे पोहोचले पोलिस...
- 11 जानेवारी रोजी अछनेरा पोलिस स्टेशनमध्ये 3 मुली हरवल्याची तक्रार आली. त्या घरातून निघाल्या, पण परतल्या नव्हत्या.
- मुली बेपत्ता झाल्यावर कुटुंबीयांनी त्यांच्या एका मैत्रिणीवर आरोप केला होता. त्यांचे म्हणणे होते की, ती मुलगी मोबाइल बाळगते आणि तिनेच त्यांना बहकवून कुठेतरी पाठवले आहे.
- पोलिसांनी त्या मैत्रिणीची चौकशी केल्यावर त्यांना त्यात काहीही तथ्य आढळले नाही.
- बुधवारी दुपारी एका मुलीने आपल्या घरी फोन करून आपल्या ख्यालीखुशालीची असल्याची माहिती आईला दिली होती. मुलीने आईला फोन केल्यावर पोलिसांनी मोबाइलची लोकेशन ट्रेस करून त्यांना ताब्यात घेतले.
शिक्षण घेऊ देत नाहीत वडील, कुठे यायला-जायलाही बंधने...
- मुली म्हणाल्या, ''पप्पा, शिकू देत नाहीत. सोबतच कुठे जाऊही देत नाहीत. परेशान होऊन घरातून आम्ही 5 हजार रुपये, गळ्यातील सोन्याची चेन आणि कानातले घालून 11 जानेवारीला घरातून पळून गेलो.''
- ''बाहेर निघण्याआधी सर्वात पहिले कामाच्या शोधात आम्ही झांशीला गेलो आणि काम न मिळाल्याने तिथून गोव्याला गेलो. पण काहीच काम न मिळाल्याने परत आग्र्यात येऊन येथे एका हॉटेलमध्ये थांबलो.''
- ''येथे एका शाळेत एकीला 1700 रुपये और दुसरीला एका मॉलमध्ये 2500 रुपयांची नोकरी मिळाली होती.''
- ''पैसे संपल्यावर आम्ही अंगठी आणि बांगड्या विकून खर्च भागवला.''
आताही घरच्यांसोबत राहायचे नाही मुलींना
- तथापि, तिन्ही मुली अजूनही आपल्या घरच्यांसोबत राहायला तयार नाहीत.
- पोलिसांनी मुलींना नारी निकेतनमध्ये पाठवले असून नंतर त्यांचा कोर्टापुढे जबाब घेतला जाणार आहे.
- मुलींनी त्यांच्यासोबत कोणताही वाईट प्रकार झाला नसल्याचे म्हणाल्या. मुलींचे म्हणणे आहे की, त्यांना इतर मुलींप्रमाणेच स्वातंत्र्य पाहिजे, पण घरचे सगळ्या गोष्टींवर बंधने घालतात. म्हणूनच आम्हाला त्यांच्यासोबत राहायचे नाही.''
काय म्हणतात पोलिस?
- अछनेराचे एसओ अजय म्हणाले, ''11 जानेवारीपासून मुली बेपत्ता होत्या. बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिस त्यांचा शोध घेत होते. मुलींचे मोबाइलची लोकेशन ट्रेस करून पोलिसांनी बुधवारी रात्री छापा मारून त्यांना आग्राच्या ईदगाहच्या एका हॉटेलातून ताब्यात घेतले.''
- ''मुली आपल्या खऱ्या ओळखपत्रावर हॉटेलमध्ये राहत होत्या. चौकशीत मुलींनी घरात कडक बंधने असल्याने स्वत:हून घरातून निघून गेल्याचे म्हटले आहे.''
- ''मुलींना सध्या नारी निकेतनमध्ये ठेवण्यात आले आहे, येथून त्यांचा आता कोर्टापुढे जबाब नोंदवला जाईल.''
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिकमधून या मन सुन्न करणाऱ्या प्रकरणाविषयी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.