आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ - हिंदी साहित्याचा उल्लेख होताच सर्वात आधी प्रेमचंद यांचे नाव ओठांवर येते. प्रेमचंद त्यांच्या कथांमध्ये सामाजिक समस्या आणि नातेसंबंधांची अशी काही पेरणी करायचे की, सर्वांना एक नवा बोध मिळायचा. divyamarathi.com या महान साहित्यिकाची ही कहाणी संक्षिप्त स्वरूपात देत आहे.
आर्थिक ओढाताणीत जगले प्रेमचंद, विकावी लागली लिहिलेली पुस्तके
- प्रेमचंद यांचा जन्म 31 जुलै 1880 मध्ये झाला. त्यांचे दुसरे नाव धनपत राय आणि वडिलांचे नाव अजायब राय होते.
- ते 8 वर्षांचे होते तेव्हाच त्यांच्या आईचे निधन झाले. 15 वर्षांच्या वयात त्यांचे लग्न झाले, परंतु लिखाणातून एवढी कमाई होत नव्हती की, पत्नीला सर्व सुविधा देता येतील. एक वेळ तर अशी की, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पुस्तकेही विकावी लागली.
- सर्व अडचणींशी संघर्ष करत त्यांनी वाराणसीमध्ये प्रिंटिंग प्रेस सुरू केली होती. मुले मोठी झाल्यावर ते त्यांची प्रेस विकून इलाहाबादमध्ये शिफ्ट झाले.
- प्रेमचंद यांची नमक का दरोगा, ईदगाह, पंच परमेश्वर, बडे भाई साहब, पूस की रात, शतरंज के खिलाडी आणि कफन या कथा विश्वसाहित्याचा भाग बनल्या आहेत. याशिवाय सौत, दो बैल आणि मैकू यासारख्या कथा आजही लोकांना आकर्षित करतात.
मुन्शी प्रेमचंद यांची कहाणी \'नया विवाह\' (नवा विवाह)
- सेठजी लाला डंगामलने नवे लग्न केले तेव्हापासून त्याची जवानी नव्याने जागी झाली. जेव्हा पहिली पत्नी जिवंत होती, तेव्हा ते घरात खूप कमी वेळ राहायचे. सकाळी 10-11 वाजेपर्यंत पूजा-पाठच करत राहायचे. ती 40 ची होती आणि हे 43चे, पण तरीही तिला म्हातारी अन् स्वत:ला जवान समजायचे.
- तिने मेकअप केलेला त्यांना खटकायचा. जर बाहेर फिरायला न्या म्हणाली तर कसंनुसं ताेंड करायचे.
- आता सेठजी नव्या पत्नीसह सैर करायला आतुर राहातात. तिच्यासाठी कधी-कधी दुकानातही जात नव्हते. अन् आता ती मात्र यांच्यासोबत फिरायला तयार नव्हती.
पुढच्या इन्फोग्राफिक्समधून पाहा, काय होता या सेठजीच्या नव्या लग्नाचा क्लायमॅक्स...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.