आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! या मंदिरात प्रवेशाआधी पुरुषांना घालावे लागतात महिलांचे कपडे, असे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात अशीही काही मंदिरे आहेत, जेथे पुरुषांना प्रवेश प्रतिबंधित आहे. येथे तुम्हाला अशाच एका मंदिराबाबत माहिती देत आहोत, जेथे पुरुषांना प्रवेश वर्ज्य आहे. तरीही एखाद्या पुरुषाला येथे प्रवेश करायचाच असेल तर त्याला जाण्याआधी महिलांचे कपडे घालावे लागतील, आणि महिलांप्रमाणे साजशृंगारही करावा लागेल. पुरुषांना मंदिरा प्रवेश करण्यापूर्वी 16 शृंगार करावा लागतो. यासाठी मंदिर परिसरात पूर्ण व्यवस्थाही केलेली आहे. साजशृंगार करताना पुरुषांना डोळ्यात काजळ, ओठांवर लिपस्टिक लावावी लागते. केसांत फुल आणि गजराही माळावा लागतो.  हे अनोखे मंदिर आहे केरळच्या कोल्लम जिल्ह्यात. मंदिराचे नाव आहे कोत्तानकुलंगारा मंदिर. जेथे पुरुषांना प्रवेश निषिद्ध आहे. या मंदिरात महिला आणि किन्नरांना प्रवेश तर मिळतो, पण पुरुष तेव्हाच आत जाऊ शकतात जेव्हा ते स्त्रियांप्रमाणे कपडे परिधान करतील.  

या कोत्तानकुलंगा देवी मंदिराची ही विचित्र परंपरा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा शेवटच्या स्लाइडवर... 

बातम्या आणखी आहेत...