आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षांच्या होत्या इंदिरा, जेव्हा फिरोज यांनी केले होते लग्नासाठी प्रपोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - सोमवारी राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. या पदासाठी इतर कुणीही नामनिर्देशन दाखल केले नव्हते. राहुल आपली आजी दिवंगत इंदिरा गांधींना आदर्श मानतात. या निमित्ताने DivyMarathi.Com त्यांचे आजोबा फिरोज गांधी आणि आजीशी निगडित फॅक्टस वाचकांना शेअर करत आहे.

 

16 वर्षांच्या इंदिरांना केले होते प्रपोज
- 1930 मध्ये फिरोज गांधींनी शिक्षण सोडून स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेतली. त्याच वर्षी त्यांनी आपले सरनेम \'घांडी\'चे गांधी केले होते.
- 1930 मध्ये फिरोज लालबहादूर शास्त्रींसोबत 19 महिने तुरुंगवास भोगला. त्यांना फैजाबादच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. यानंतर 1931 आणि 1933 मध्ये ते जवाहरलाल नेहरूंसहही तुरुंगात राहिले.
- स्वातंत्र्य चळवळीदरम्यान फिरोज नेहरू कुटुंबाच्या जवळ आले. ते इंदिरांच्या आई कमला नेहरूंचे निकटवर्तीय बनले.
- 1933 मध्ये फिरोज यांनी कमला नेहरू यांच्याकडे इंदिराजींना मागणी घातली. त्यांनी तेव्हा हे म्हणून टाळले की, मुलगी फक्त 16 वर्षांची आहे.
- 28 फेब्रुवारी 1936 रोजी आजारपणामुळे कमला नेहरू यांचे देहावसान झाले. तेव्हा कमला स्वित्झर्लंडच्या लाउसेन शहरात होत्या. त्यांच्या अंतिम क्षणांत फिरोजच त्यांच्या जवळ होते.
- कमला नेहरू यांच्या निधनानंतर फिरोज आणि इंदिरा यांची मैत्री आणखी दृढ झाली. मार्च 1942 मध्ये दोघांनी अलाहाबादेत लग्न केले होते. तेव्हा देशात भारत छोडो आंदोलनाने जोर धरला होता.
- देशाच्या स्वातंत्र्यानंतर इंदिरा आधी फिरोज अलाहाबादेत स्थायिक झाले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इंदिराजींशी निगडित रेअर फॅक्ट्स...

बातम्या आणखी आहेत...