आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामस्तकाभिषेक होतो 12 वर्षांतून एकदा; पाहा भगवान बाहुबलींची पंचामृतातील बहुरंगी रूपे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

५८ फूट उंच मूर्ती, जगातील दुसऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती, महामस्तकाभिषेक साेहळा १२ वर्षांतून एकदा

 

 

मंदिराची दिनचर्या तर नऊ दिवसांचा सोहळा

सकाळी ६ वाजता मंदिर खुले, ६ ते ८ दर्शन, ८ ते २.३० वाजेपर्यंत महामस्तकाभिषेकासाठी निमंत्रित भाविकांना प्रवेश, २.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले. रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत मंदिर परिसराची पाहणी, रात्री १० वाजता मंदिर बंद. असा नऊ दिवसांचा सोहळा.


अभिषेकाची संधी
तीन महिन्यांपूर्वीच निमंत्रित अभिषेक बोलीचे नियोजन, पहिल्या अभिषेकाचा मान सुरेश पाटणी (किसनगड, राजस्थान) यांना मिळाला. ११ कोटी ६१ लाख रुपयांची पहिली बोली. सर्वसाधारण ५१०० रुपये देणगी. यंदा िवदेशातून कलश आले. त्यांच्या उपस्थितीत अभिषेक.


२०० त्यागी, १०० माताजींचे वास्तव्य
महामस्तकाभिषेकासाठी चार मोठ्या संघांसह २०० जैन मुनी, १०० माताजी वास्तव्यास आहेत. त्यांच्यासह सेवेकऱ्यासाठी हजार तात्पुरती घरे. आहारासाठी ११४ चौके, २ मंदिरे, १ आयुर्वेदिक दवाखाना, प्रवचनासाठी एक लाख स्वेअर फुटांचा चामुंडराय सभामंडप.


अन्य अभिषेक,

उसाचा रस - महत्त्व -शुद्ध भावना निर्माण होते. भाव शुद्ध हाेतो.

केशर - महत्त्व -सुखाचा अनुभव देणारा आहे. रोग नष्ट होतात.

सर्व औषधी - महत्त्व -चारही दिशांना आरोग्य नांदावे. 

शांतिधारा - महत्त्व -विश्वाचे कल्याण व्हावे.

दीपअावरण - महत्त्व -अंधार नष्ट हाेतो आणि चांगल्या सवयी लागतात.

 

फेब्रुवारीत का होतो महामस्तकाभिषेक?

-इ.स. ९८१ मध्ये फेब्रुवारी महिन्यात झाला होता. या काळात उत्तरायण सुरू होते.

 

छायाचित्र व संकलन : चंद्रकांत मिराखोर, अजित संगवे 

माहिती साहाय्य : प्रा. डाॅ. महावीर शास्त्री.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, भगवान बाहुबलींची विविध रूपे...

बातम्या आणखी आहेत...