आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या पत्नीचे दुसऱ्याशी अवैध संबंध असल्याचे कळले, तर तुम्ही काय कराल?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद - यूपीच्या लोकसेवा आयोगाकडून आयोजित सिव्हिल जज एंट्रन्स एक्झाम (PCS (J) 2016 चा रिझल्ट गतवर्षी घोषित झाला. प्रतापगडच्या लालगंजचे विनोद पांडे यांनी या परीक्षेत यश मिळवले. त्यांना 3rd रँक मिळाली. DivyaMarathi.Com शी खास इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शेअर केले, त्यांची योग्य उत्तरे देऊन त्यांनी सिव्हिल जजची एक्झाम क्रॅक केली.

 

12वी पास करताच जॉइन केली होती एअरफोर्स
- विनोद म्हणाले, मी प्रतापगडमधील रामगड रैला गावाचा रहिवासी आहे. माझे वडील पोस्ट ऑफिसमध्ये एजंट आहेत.
- माझे बालपण खूप गरिबीत गेल. 1997 मध्ये 12वी पास होताच माझे सिलेक्शन एअरफोर्समध्ये सार्जंट (टेक्निकल विंग) मध्ये झाले होते. मी जॉब करतच पुढचे शिक्षण सुरू ठेवले. 2010 मध्ये मुंबईत पोस्टिंग होती. त्यादरम्यान मी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी पूर्ण केली. तेव्हा मी संध्याकाळचे तसेच रात्रीचे क्लासेस अटेंड करून लॉचे शिक्षण पूर्ण केले. मग मी तेथेच थांबलो नाही. 2013 मध्ये मी कुरुक्षेत्र विद्यापीठातून LLM केले. 2014 मध्ये नेटही क्वालिफाय केले होते.


सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून मिळाली प्रेरणा...
- विनोद सांगतात, LLB दरम्यान दररोज वर्कशॉप ऑर्गनाइज व्हायचे, यात अनेक प्रसिद्ध वकील आणि जज आपले अनुभव शेअर करायचे. तेथे माझी भेट मुंबई बॉम्ब ब्लास्टचे पब्लिक प्रॉसिक्यूटर उज्ज्वल निकम यांच्याशी झाली. त्यांचे व्याख्यान माझ्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. मी एवढा प्रभावित झालो की, मी एअरफोर्समधून व्हीआरएस घेऊन सिव्हिल सर्व्हिस एक्झाम क्रॅक करण्याचा निश्चय केला.
- 2016 मध्ये मी घरी परतलो आणि पीसीएस-जे च्या तयारीत गुंतलो. आणि पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले.


इंटरव्ह्यूमध्ये या प्रश्नांची उत्तरे देऊन क्रॅक केली एक्झाम...
- 18 सप्टेंबर 2017 रोजी अलाहाबादमध्ये डॉ. लॉरिक यादव यांच्या अध्यक्षतेखालील बोर्डने त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. पॅनलमध्ये एक हायकोर्ट जज आणि दोन विषयतज्ज्ञ उपस्थित होते. इंटरव्ह्यू तब्बल 20 मिनिटे सुरू होता.
- यांना विचारण्यात आला सर्वात रोचक प्रश्न...
Q. तुम्हाला कळले की तुमच्या पत्नीचे दुसऱ्याशी अवैध संबंध आहेत, तुम्ही काय कराल?
Ans. मी भादंवि कलम 497चा प्रयोग करून त्या व्यक्तीविरुद्ध खटला दाखल करेन.
Q. मग अशा स्थितीत तुम्ही तुमच्या पत्नीविरुद्ध काही कारवाई करू शकता का?
Ans. या स्थितीत माझी पत्नी दोषी मानली जाणार नाही. मी तिच्याविरुद्ध कोणतीही लीगल अॅक्शन घेऊ शकणार नाही.
(इनपुट - उज्ज्वल सिंह, लखनऊ) 


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, ते प्रश्न ज्यांच्या उत्तरांनी यांना बनवले सिव्हिल जज...

बातम्या आणखी आहेत...