आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही ही नूडल्स खाता का? मग ही बातमी तुम्ही वाचायलाच हवी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोगा (पंजाब) - शहरातील मेन बाजारमध्ये नगरपालिकेच्या बाहेर फास्ट फूडचे काम करणाऱ्या एका फूड कॉर्नरच्या दुकानावर ध्यानचंद नावाच्या व्यक्तिच्या तक्रारीवरून हेल्थ डिपार्टमेंटचीने छापेमारी केले. यावेळा टीमने नूडल्स, मंच्यूरियनचे सँपल लॅबमध्ये पाठवले आहे. ध्यानचंद यांनी आपल्या मुलांसाठी या दुकानावरून नूडल्स पॅक करून नेले होते. घरी गेल्यावर त्यांनी नूडल्सचे पाकिट उघडले तेव्हा त्यात एक किडा फिरत होता. याची माहिती त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला दिली.


तुमच्यासोबत देखील होऊ शकते....
- टीमने सांगितले की, लोकांनी हे फास्ट फूड खाणे टाळावे. परंतु, कुणाला खायचेच असेल, तर त्यांनी व्यवस्थित तपासून खावे.
- आरोग्य विभागाच्या टीमने तक्रारीच्या आधारावर फूड सुरक्षा ऑफिसर अभिनव खोसला वकमिश्नर हरप्रीत कौरच्या मार्गदर्शनाखाली दुकानात लोकांना देण्यात येणाऱ्या साहित्याचे सँपल पॅक करून चंदीगड येथे लॅबमध्ये पाठवले आहे.
- तसेच, टीमने तयार नूडल्स, बर्गर व मंचूरियन यासह इतर पदार्थ तेथेच नष्ट करून टाकले. 
- फूड सुरक्षा अधिकारी अभिनव खोसला यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारावर दुकानातील सँपल घेऊन लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. रिपोर्ट आल्यानंतर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...