आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभारत-2019: जातीवर अाधारित अारक्षण टिकणार नाही; बंड हाेईल- श्रीश्री रविशंकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अार्ट अाॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्रीश्री रविशंकर म्हणतात की, माेदी सरकारकडून खूप अपेक्षा हाेत्या. लाेकांना वाटले हाेते की, नाेकऱ्या मिळतील; परंतु हे कठीण अाहे. ते बाबा-संतांवर लक्ष ठेवण्यासाठी वेगळ्या सरकारी समितीचे समर्थन करतात. राजकारण, राम मंदिर, अारक्षणासह अनेक मुद्द्यांवर दैनिक ‘भास्कर’ दिल्लीचे संपादक अानंद पांडेय यांनी श्रीश्री रविशंकर यांच्याशी विशेष चर्चा केली. सादर अाहेत चर्चेचे मुख्य मुद्दे...

 

प्रश्न : माेदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाली अाहेत. एकंदरीत या वर्षांकडे अापण कसे पाहता? 
उत्तर :
हे तर तुमचे काम अाहे; तुम्ही सर्व अाकडेवारी पाहता. अाम्ही हे कसे ठरवू शकताे? 


प्रश्न : काही तरी बदल तुम्हाला दिसत असेलच ना? 
उत्तर :
सकारात्मक तर खूप अाहे. मात्र, अपेक्षादेखील खूप जास्त हाेत्या. लाेकांना हा विश्वास हाेता की, सर्वांना नाेकऱ्या मिळतील; परंतु ते कठीण अाहे. 


प्रश्न : माेदींच्या अार्थिक धाेरणांबद्दल काय मत अाहे? 
उत्तर :
दीर्घकालीन फायदे तर अाहेत. जीएसटी तर लागू हाेणारच हाेता; परंतु त्याच्या लागू हाेण्यात अनेक त्रुटी राहिल्या. तथापि, याचे चांगले परिणाम समाेर येतील. 


प्रश्न : माेदीविराेधी म्हणतात की, ते सत्तेत अाल्यानंतर समाजात असहिष्णुता वाढली? 
उत्तर :
विराेध करणारे कुठला ना कुठला मुद्दा घेऊन विराेध करणारच व जाेपर्यंत एखाद्या कामाला विराेध हाेत नाही, ताेपर्यंत ते काम पूर्णदेखील हाेत नाही. त्यामुळे विराेध तर झालाच पाहिजे. 


प्रश्न : पीएम म्हणून राहुलकडे कसे पाहता? 
उत्तर :
(थाेड्या संकाेचासह) धर्माच्या क्षेत्रात राहत असल्याने अाम्हा सर्वांसाठीही काही कायदे, नियम असतात. स्वत:चे मत सर्वांवर लादले जाऊ शकत नाही. नि:पक्ष राहताे. धर्मगुरू असाे, न्यायाधीश असाे की मीडिया असाे, अापण नि:पक्ष असले पाहिजे. 


प्रश्न : तुमच्याकडे जगभरात काम केल्याचा अनुभव अाहे. तुम्हाला असे कधी वाटते का की, ही व्यक्ती माेदींना टक्कर देऊ शकते? 
उत्तर : काेणताही माणूस माेठा हाेऊ शकताे. देशातील चांगले नेते वर येऊ शकतात. 


प्रश्न : अयाेध्या प्रकरणातील माेहीम कुठपर्यंत अालीय? 
उत्तर :
अयाेध्येच्या मुद्द्यावर अाम्ही असा उपाय सांगितला, ज्यामुळे दाेन्ही गटांचा विजय हाेईल. अाता दाेन्ही गटांचे जे प्रमुख वा धर्मगुरू अाहेत, त्यांनी पुढे अाले पाहिजे. ते येतील, असा मला पूर्ण विश्वास अाहे. हा मुद्दा साैहार्दपूर्ण साेडवला जावा, अशी सर्व लाेकांची इच्छा अाहे. याप्रकरणी संघर्ष करणारे फारच कमी जण अाहेत. 


प्रश्न : माेदी सरकारकडे माेठे बहुमत हाेते. तरीदेखील ते राम मंदिराच्या मुद्द्यावर काम का करू शकले नाही? 
उत्तर :
सरकार सर्व कामे करू शकते असे नाही. विशेषत: राम मंदिराच्या मुद्द्यावर तर सर्वसामान्य जनतेलाच पुढे यावे लागेल. साेबतच दाेन्ही गटांतील धार्मिक लाेकांनाही पुढे यावे लागेल. न्यायालय जाे निर्णय देईल त्यामुळे एक गट नाराज हाेईल व जे नाराज हाेतील ते स्वस्थ बसणार नाहीत. 


प्रश्न : सरकारकडे बहुमत हाेते. त्यामुळे सरकारने याप्रकरणी पुढाकार घ्यायला हवा हाेता, एखादी अधिसूचना काढायला हवी हाेती किंवा कायदा बनवायला हवा हाेता, असे तुम्हाला नाही वाटत का? 
उत्तर :
माझ्या दृष्टीने तर हे याेग्य ठरले नसते. सरकारच्या अधिसूचना काढण्याने लाेकांची मने जुळली जाऊ शकत नाहीत. एक गट असमाधानी राहीलच. 


प्रश्न : हिंदुस्तान कधी तरी हिंदू राष्ट्र बनू शकेल, असे सध्याची परिस्थिती पाहून तुम्हास वाटते काय? 
उत्तर :
हिंदू राष्ट्र काय अाहे? जेथे समानता असावी, समान अधिकार असावेत, लैंगिक समानता असावी, सर्वांना समान संधी मिळावी, पूजापाठाचे स्वातंत्र्य मिळावे. ज्यास अापण धर्मनिरपेक्ष म्हणताे तीच तर हिंदुत्वाची मूल्ये अाहेत. विविधता मान्य करताे... सर्वांचा विकास व सर्वांची प्रगती मानताे, तेच हिंदू राष्ट्र अाहे. 


प्रश्न : काही काळापासून दलितांचे मुद्दे वेगाने बाहेर येत अाहेत. तुमच्या मते यामागे काय कारण असावे? 
उत्तर :
हल्ली काेठेही काही झाल्यास दलितवर्ग संघटित हाेऊन त्याचा विराेध करतात. याचे काैतुक झाले पाहिजे. काही जण याचा गैरफायदा घेत अाहेत; परंतु चुकीच्या मुद्द्यांसाठी संघटित हाेणे याेग्य नाही, असेही मी म्हणेन. 


प्रश्न : अारक्षणाबाबत तुमचा दृष्टिकाेन कसा? 
उत्तर :
गरीब, मागास लाेक प्रत्येक जातीत अाहेत. त्यांचे जीवनमान उंचावले गेले पाहिजे. सामाजिक-अार्थिकदृष्ट्या त्यांना अारक्षण मिळणे गरजेचे अाहे. 


प्रश्न : सध्या तरी असे हाेत नाहीये. ब्राह्मणाचा मुलगा गरीब असेल तरीही त्याला पाहिजे त्या सुविधा मिळत नसल्याची स्थिती अाहे. 
उत्तर :
हे पहा, असे खूप दिवसांपर्यंत चालणार नाही. पुन्हा बंड पुकारून ते उभे राहतील. 


प्रश्न : गरिबीच्या अाधारावर अारक्षण मिळाले पाहिजे. तुम्ही याचे समर्थन करता? 
उत्तर :
हाे, मी समर्थन करताे. सवर्ण किंवा उच्च जातीतील लाेकदेखील गरीब असल्याचे मी पाहिले अाहे. दिल्लीत कुलीचे काम करत अाहेत, सायकलरिक्षा चालवत अाहेत- हे सर्व सवर्ण वर्गातील लाेक अाहेत. गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. 


प्रश्न : असे म्हटले जाते की, अार्ट अाॅफ लिव्हिंग म्हणजे समाजातील अभिजात वर्ग? 
उत्तर :
हा गैरसमज अाहे. अभिजात वर्ग असेल तर मग काेट्यवधी फाॅलाेअर्स कसे असू शकतात? 


प्रश्न : काही काळापासून संत-बाबा अयाेग्य कारणांनी चर्चेत येत अाहेत. अासाराम असाे, राम-रहीम असाे वा अन्य कुणी... 
उत्तर :
(प्रश्न पूर्ण न हाेऊ देत) देशात सुमारे एक लाखाच्या अासपास संन्यासी असून, ते लाेकांना चांगला मार्ग दाखवत अाहेत. तसेच व्यसनांपासून दूर करून मानवी मूल्यांच्या प्रसारासाठी माेठे काम करत अाहेत. यात दाेन-चार जण अपवाद असतातच. त्यांच्याबाबतच जास्त दाखवले जात अाहे. 


प्रश्न : ढाेंगी बाबांना लगाम लावण्यासाठी कायद्याने पुढे यावे की समाजाने? 
उत्तर :
कायदेदेखील कठाेर झाले पाहिजेत व समाजातही एखादी अशी समिती असावी, जिने अशा प्रकारांवर लक्ष ठेवावे; असे प्रकार राेखावेत. 

 

प्रश्न : काेणताही संत वा साधू ब्रॅण्ड बनताच अाराेग्याची उत्पादने बनवू लागताे. असे का? 
उत्तर :
बेराेजगारी जास्त असल्याने राेजगार देण्यासाठी असे करत अाहेत. तसेच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती शिकवत अाहेत. त्यासाठी मार्केट नसल्याने अाम्हालाच खरेदी करावे लागते. नफ्याचे ध्येय नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...