आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन मुनींनी याचिका दाखल करून २५ वर्षांच्या तपश्चर्येची दिली आठवण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- बडोद्यातील १९ वर्षीय विद्यार्थिनीवर धार्मिक विधीसाठी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या जैनमुनी शांतीसागर महाराज यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. या याचिकेत जैनमुनी शांतीसागर महाराज यांनी म्हटले, मी गेल्या २५ वर्षांपासून तपश्चर्या करतो आहे. माझ्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. तो खरा मानला तरी तक्रारदाराने घटनेच्या १३ दिवसांनंतर फिर्याद दिली आहे. याच आधारे जैनमुनींना जामीन मिळाला पाहिजे.  


यापूर्वीही जैनमुनींनी जामीन अर्ज दाखल केला होता, पण नंतर तो त्यांनी परतही घेतला. बलात्कार प्रकरणात जैनमुनी शांतीसागर यांच्याविरोधात पोलिसांनी न्यायालयात २५० पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर जैनमुनी यांनी पुन्हा जामीन अर्ज दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...