आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. रविवारी सत्ताधारी पक्षाच्या बैठकीत त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. 27 डिसेंबरला त्यांचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी नावाची घोषणा झाल्यानंतर जयपाल ठाकुर यांनी राज्यपालांची भेट घेतली.सुरुवातीला माजी केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे होते. मात्र कास्ट फॅक्टरमुळे ठाकूर यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आले. नड्डा हे ब्राह्मण आहेत आणि हिमाचलमध्ये ठाकूर समाज बहुसंख्य आहे.
या निवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रेम कुमार धूमल यांचा पराभव झाल्याने या पदासाठी कोणाची निवड केली जाणार याची सुरुवातीपासूनच उत्सूकता होती. अखेर आज 52 वर्षीय ठाकूर यांची घोषणा करण्यात आली. ते 5 वेळेस विधानसभेवर निवडून गेले आहेत.
ठाकूर आणि धूमल गटात संघर्ष
- केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत जयराम ठाकूर आणि धूमल गटाने परस्परांविरुद्ध घोषणाबाजी केली. एवढेच नव्हे तर प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले होते. या प्रकरणाची पक्ष हायकंमाडने गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे.
- भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटले आहे की, यादरम्यान ज्या गोष्टी समोर आल्या त्या नाकारता येऊ शकत नाही. दोषी नेत्यांविरुद्ध कारवाई केली जाईल.
जेवणात खडा आल्याने जशी चव बिघडते, तसाच काहीसा विजय
'ज्याप्रमाणे स्वादिष्ठ जेवणात खडा आल्याने चव बिघडते तसाच काहीसा विजय या निवडणुकीत आम्हाला मिळाला आहे. कित्येक जागांवर तर असे निकाल आले ज्याची आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती. यात माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल यांचा पराभव सर्वात आश्चर्यजनक होता', असे हिमाचल भाजपचे अध्यक्ष सतपाल सत्ती यांनी म्हटले आहे. पराभवाची समीक्षा करण्यासाठी अद्याप कोणत्याही पॅनलची निर्मिती करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.