आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेत पाक जिंदाबादच्या घोषणा, काश्मीरचे आमदार म्हणाले- \'मला नाही वाटत यामुळे कोणाला त्रास झाला\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू-काश्मीर विधानसभेची कार्यवाही शनिवारी वादळी राहिली. भाजप आमदाराने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि रोहिंग्या मुस्लिमांचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, नॅशनल कॉन्फ्रसचे नेते अकबर लोन यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. लोन म्हणाले, 'मी घोषणा दिल्या हे सत्य आहे. त्यामुळे कोणाला त्रास होण्याचे कारण नाही. हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे.' शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी सुंजवा आर्मी कँपवर हल्ला केला. यात एक जवान शहीद झाला आहे तर दोन जखमी झाले आहेत. 

 

काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह म्हणाले, 'ते पाकिस्तानी दहशतवादी होते. त्यांना घेरण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणा आणि आर्मीने वेगाने हलचाली करत त्यांना घेरले आहे. सुंजवा येथील मागच्या दारातून फायरिंग झाली होती. दहशतवाद्यांना तिथेच रोखण्यात यंत्रणांना यश आले.'
- 'तीन ते चार दहशतवादी असण्याल्याची माहिती आहे. त्यांना एका कोपऱ्यातच रोखण्यात आले आहे. तिथे त्यांना घेराव टाकण्यात आला आहे. काही लोक आर्मी कँपमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती होती. अजूनही तिथे फायरिंग सुरु आहे. जवान बहादुरीने लढत आहेत. काश्मीरचे लोक शूर आहेत. जर बाहेरुन कोणी काही मदत करत असेल तर त्याचाही शोध घेतला जाईल.'

 

बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित 
- भाजपचे एमएलसी विक्रम रंधावा म्हणाले विधानसभेत जम्मूमध्ये राहात असलेले बांगलादेशी आणि रोहिंग्यांचाही मुद्दा उपस्थित झाला. 
- 'त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जर त्यांना रोखले नाही तर ते दहशतवादी संघटनांसारखे काम करायला लागतील. त्यांच्यामाध्यमातून दहशतवादीही तिथे आश्रय घेऊ शकतात.' 

बातम्या आणखी आहेत...