आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी वर्दीत अतिरेक्यांचा जम्मूतील छावणीवर हल्ला;सुभेदारसह 2 शहीद, दोन अतिरेकी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- जम्मूतील संुजवा लष्करी छावणीवर शनिवारी पहाटे ४.५५ वाजता अतिरेक्यांनी हल्ला केला. यात सुभेदार मदनलाल चाैधरी व हवालदार हबीबुल्ला कुरेशी शहीद झाले. कर्नल रँकचे सीओ, मेजर व सुभेदाराच्या मुलीसह ९ जण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. दोन अतिरेक्यांचाही खात्मा करण्यात आला. 


लष्कराच्या वर्दीत आलेले ३-४ अतिरेकी अंदाधुंद गोळीबार व ग्रेनेड्स फेकत अधिकाऱ्यांच्या घरात घुसले. तेथे जवानांच्या कुटुंबीयांसह ७०० लोक राहतात. हल्ल्याच्या वेळी बहुतांश लोक झोपेत होते. इमारतीत अतिरेकी घुसल्याने ओलीसनाट्याची स्थिती उद््भवली. पॅरा कमांडाे, स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप, गरुड कमांडो व स्नायपर्सनी रात्री उशिरापर्यंत १५० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. एकाही नागरिकाचा मृत्यू होऊ नये म्हणून खबरदारी बाळगली जात आहे.

 

ड्रोन, विमानांच्या मदतीने शोधमोहीम 

- रात्रीच्या अंधारात अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी ठरू नये म्हणून लष्कराने जनरेटर, प्रखर लाइट्सची व्यवस्था केली. 
- ड्राेन आणि हवाईदलाच्या मदतीने अतिरेक्यांचे लोकेशन शोधले जात आहे. कॅम्पच्या बाहेर पोलिस, सीआरपीएफची नाकेबंदी आहे. पाच किमी परिसरातील शाळा बंद केल्या आहेत.
- अतिरेकी अफझल गुरूच्या पाचव्या मृत्युदिनी ९ फेब्रुवारीला जैश - ए- मोहंमदचे अतिरेकी मोठा हल्ला करू शकतात, अशी गुप्तचरांची मािहती होती.
- या कॅम्पवर २००७ मध्येही अतिरेकी हल्ला झाला होता. त्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता.

 

नाल्याजवळ पडक्या भिंतीवरून घुसले अतिरेकी 
सूत्रांनुसार, छावणीजवळून जाणाऱ्या नाल्याच्या मार्गाने अतिरेकी आत घुसले. तेथील संरक्षक भिंत तुटलेली असल्याने तेथे फक्त कुंपण लावलेले आहे. आत घुसताच त्यांनी गोळीबार व ग्रेनेड्स फेकले. फॅमिली क्वार्टर्सकडे मोर्चा वळवत त्यांनी सुभेदार मदनलाल चौधरी व त्यांची मुलगी नेहावर गोळ्या झाडल्या. समोरून येणाऱ्या प्रत्येकावर गोळीबार केला. मृत अतिरेक्यांकडे एके-५६ रायफली व दारूगोळा सापडला आहे.


मागच्या दाराने घुसले दहशतवादी 
- जम्मू-काश्मीरचे डीजीपी एसपी वैद यांनी सांगितले की, दहशतवादी मागील दरवाजाने कॅम्पमध्ये घुसले. कॅम्पमध्ये तीन दहशतवादी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, त्यांना घेरण्यात आले आहे. 
- हल्ल्यातील जखमींमध्ये एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरची मुलगीही आहे. 
- न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार फायरिंगमध्ये एकाचा मृत्यूही झाला आहे. मात्र अद्याप तशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 


गुप्तचर यंत्रणांनी दिली होती माहिती 
- न्यूज एजन्सीच्या मते, इंटेलिजन्सने आर्मी किंवा सिक्युरिटी एस्टाब्लिशमेंटवर जैशच्या हल्ल्याची वॉर्निंग दिली होती. 
- एजन्सीने म्हटले की, अफजल गुरूच्या डेथ अॅनिव्हर्सच्या पार्श्वभूमीवर जैशकडून मोठे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 9 फेब्रुवारी 2013 ला अफजलला फाशी देण्यात आली होती.

 

दहशतवाद्यांनी बंकरवर केली फायरिंग...
वृत्तसंस्थेनुसार, जम्मूचे आयजी एस डी सिंह जामवाल यांच्या हवाला देत सांगितले की, शनिवारी पाहाटे 4:55 वाजता संतरीच्या बंकरवर फायरिंग करण्यात आली. याला जवानांकडून प्रत्यूत्तरादाखल फायरिंग करण्यात आली. नंतर दहशतवादी सैन्याच्या एका कॉर्टरमध्ये घुसले आहेत.


आसपासच्या  शाळा बंद ठेवण्याचे निर्देश...
- या दहशतवादी हल्ल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कॅम्पच्या आसपास 500 मीटर अंतरावरील सर्व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.


गेल्या महिन्यात झाला कॅम्पवर हल्ला...
- जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये 7 जानेवारीला सीआरपीएफ कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला होता, यात 3 कॅप्टनसह 5 जवान शहीद झाले होते.
- प्रत्यूत्तरात केलेल्या कार्यावयीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्विकराली होती.

- CRPF चे प्रवक्ते राजेंद्र यादव यांनी सांगितले होते की, असे पहिल्यांदा झाले की, जेव्हा लोकल दहशतवाद्याने आत्मघातली हल्ला घडवून आणला आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...