आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी छावणी हल्ल्यातील शहिदांची संख्या 5 वर, 3 अतिरेक्यांना कंठस्नान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- जम्मूतील संुजवा लष्करी छावणीच्या निवासी भागात घुसलेल्या अतिरेक्यांविरोधात रविवारी दुसऱ्या दिवशीही मोहीम सुरू होती. शोध सुरू असताना पॅरा कमांडोचा एक सुभेदार, दोन जवान व एका जवानाच्या वडिलांचा मृतदेह सापडला. या माेहिमेत दोन सुभेदारांसह पाच जवान शहीद झाले आहेत,  तर तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश अाले.


सुभेदार मदनलाल चौधरी, सुभेदार मोहंमद अश्रफ मीर, हवालदार हबीबुल्लाह कुरेशी, नायक मंजूर अहमद, लान्स नायक मोहंमद इक्बाल यांचा शहिदात समावेश अाहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारीच हे जवान शहीद झाले हाेते.  ११ जण जखमी आहेत. यात लेफ्टनंट कर्नल रोहित सोळंकी, मेजर अविजित सिंह यांच्यासह पाच जवान, सहा महिला व मुलाचा समावेश आहे. दरम्यान, सैनिक तयार करण्यासाठी ६ ते ७ महिने लागतात. पण संघ ३ दिवसांत सैनिक तयार करू शकतो. संविधानाने परवानगी दिल्यास स्वंयसेवक मोर्चावर जाण्यास सज्ज आहेत, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...