आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jammu Firing : भाजप आमदार म्हणाले, मेहबुबां मुफ्तींच्या हट्टामुळे परिस्थिती चिघळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- पाकिस्तान 15 मेपासून आंतरराष्ट्रीय सीमेवर फायरिंग करत आहे. 

- गाव सोडून जाणारे लोक म्हणाले की, 1971 च्या युद्धानंतर त्यांनी कधीही असा गोळीबार अनुभवला नाही. 


जम्मू - भाजप आमदार लाल सिंह यांनी जम्मू सीमेवर चिघळलेल्या परिस्थितीसाठी मेहबुबा मुफ्तींना जबाबदार ठरवत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रमजानमध्ये फायरिंग     बंद करण्याच्या या महिलेच्या हट्टामुळे परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली असे ते म्हणाले. पाकिस्तानने गुरुवारी सकाळीदेखिल उरी सेक्टरच्या कमाल कोटमध्ये नियंत्रण रेषेवर विनाकारण फायरिंग केले. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान 10 दिवसांपासून अनेक भागांत फायरिंग करत आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली आहे. सुमारे 76 हजार लोकांनी 100 हून अधिक गावे रिकामी केली आहेत. 


फायरिंग बंद करण्यामागे सरकारचा उद्देश चांगला होता 
कठुआ जिल्ह्याच्या बशोली मतदारसंघाचे आमदार लाल सिंह म्हणाले, फायरिंग सलग सुरू आहे है दुर्दैवी आहे. सरकारने जतर रमजानमध्ये फायरिंग होणार नाही असे म्हटले तेव्हा त्यांचा उद्देश चांगला होता. पण या महिलेच्या (मेहबुबा मुफ्ती) जिद्दीमुळे परिस्थिती एवढी बिघडली आहे. 

कठुआ प्रकरणामुळे सोडले होते मंत्रिपद 
- जम्मूच्या कठुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीबरोबर सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ लाल सिंह यांनी रॅली काढल्याचा आरोप होता. त्यावर वाद वाढल्यानंतर त्यांनी राज्याच्या वन मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण लाल सिंह यांनी परिस्थिती चिघळू नये म्हणून रॅलीत गेल्याचे म्हटले होते. 


सर्व सेक्टरमध्ये पाककडून फायरिंग सुरू 
पाकने बुधवारीही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. कठुआ, सांबा आणि आरएसपुराच्या वस्त्या आणि चौक्यांवर मोर्टार हल्ले करण्यात आले. मंगळवारपासून बुधवारपर्यंत येथे 7 जणांचा मृत्यू झाला. बीएसएफच्या 5 जवानांसह 35 लोक जखमी झाले. न्यूज एजन्सीच्या मते, बीएसएफने गेल्या नऊ दिवसांत सुमारे 100 गांवांच्या 76 हजार लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे. 1971 च्या युद्धानंतर प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...