आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्या. मेहता यांनी रात्री उशिरा पाहिला पद््मावत; आयपीएस व 200 जवानांचा बंदोबस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- कोर्ट रूममध्ये बसून वकिलांचे युक्तीवाद, साक्षीदारांचे जबाब आणि खटल्याशी संबंधित कागदपत्रे-फाईल्स पाहणाऱ्या न्यायमूर्तींच्या पीठाने सोमवारी रात्री मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहिला. यासाठी चित्रपटगृहाचे कोर्ट रूममध्ये परिवर्तन करण्यात आले होतेे. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने आयनॉक्स (सत्यम मल्टिप्लेक्स)मध्ये कडेकोट बंदोबस्तात आयोजित खास शो मध्ये वादग्रस्त चित्रपट पद््मावत पाहिला. यावेळी कोर्टाच्या दालनात राहतात तसेच पीठाचे खासगी कर्मचारी हजर होतेे. चित्रपटात धार्मिक भावना भडकाविण्यात आल्या आहेत काय? हे पाहण्यासाठी हा चित्रपट पीठाने पाहिला. या याचिकेवर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. विशेष खेळासाठी कोणत्याही संघटनेने विरोध दर्शवला नाही. पोलिसांनी या विशेष खेळाच्या निमित्ताने मॉलच्या अवती भवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. न्या. मेहता रात्री ७.५० वाजता मल्टिप्लेक्समध्ये आले. न्या. मेहता यांना मोबाइल मॅजिस्ट्रेट व पोेलिसांचे वाहन एस्कार्ट करत मल्टिप्लेक्समध्ये आले होते. थेट पार्किंगमध्ये पोहचल्यानंतर मेहता लिफ्टद्वारे मल्टिप्लेक्समध्ये आले. रात्री १०.५० वा खेळ संपला.


पासवर्ड कोटेड चित्रपटाचा सॅटेलाइटद्वारे खास शाे

संजय लीला भन्साळी कार्यालयात पोहचले. कार्मिक मूव्हीचे पासवर्ड व इतर व्यवस्था पाहण्यासाठी चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळीच्या कार्यालयातील राजेशकुमार व स्थानिक वकिल निशांत बोडा तेथे आले होते. राजेश यांनी पासवर्ड व इतर व्यवस्थेची पाहणी केली. सॅटेलाइटद्वारे चित्रपटाचा शो दाखवला.


तपासावर गेल्यावर्षीच उच्च न्यायालयाने दिली स्थगिती : विरेंद्रसिंग व नागपालसिंग राठोड यांनी डीडवाना पोलिस ठाण्यात आयपीसी कलम १५३ ए, १५३ बी व २९५ ए नुसार पद््मावत चित्रपटात धार्मिक भावना भडकावणे, अश्लील दृश्ये दाखवणे तसेच इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करत चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, चित्रपट अभिनेता रणवीरसिंग व अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता.


भन्साळी यांच्या वतीने न्यायालयास सांगण्यात आले की,  आम्ही चित्रपट दाखवण्यास तयार आहोत. परंतु संरक्षणाची गरज लागेल. न्यायमूर्तींनी सुरक्षा ठेवण्याचे आदेश दिले होते. मल्टिप्लेक्स परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्याची ही पहिलीच वेळ असावी.

 

पद््मावतमुळे काेणाच्या भावना दुखावत नाहीत
पद््मावत चित्रपटाचे निर्माता, अभिनेता रणवीरसिंग व दीपिका पदुकोण यांना मंगळवारी मोठा दिलासा मिळाला. उच्च न्यायालयाचे न्या. संदीप मेहता यांनी निर्माता भन्साळी यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या विविध फौजदारी स्वरुपाच्या याचिका निरस्त केल्या. या चित्रपटामुळे कोणाच्या भावनांना धक्का पोहचत नाही, असे न्यायालयाने मान्य केले. तेव्हा भन्साळी यांच्या वतीने चित्रपट दाखवण्याची तयारी  दर्शवली होती. त्यामुळे सोमवारी चित्रपट दाखवला होता.

बातम्या आणखी आहेत...