आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Justin Trudeau In The Worlds Third Prime Minister Who Travel To Ahmedabad In Six Months

सहा महिन्यांत अहमदाबादला जाणारे जस्टिन ट्रुडो हे जगातील तिसरे पंतप्रधान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सोमवारी अहमदाबादच्या साबरमती आश्रमात गेले. त्यांच्यासोबत पत्नी आणि तीन मुलेही होती. तेथे त्यांनी चरखा चालवला. ते भारतीय पोशाखात होते. ते अक्षरधाम मंदिरातही गेले. ट्रुडोंनी आश्रमाच्या अभ्यागत पुस्तिकेत लिहिले की, हे खूप सुंदर स्थळ आहे. तेे शांतता, सत्य आणि सद््भावना यांचा संगम आहे. सहा महिन्यांत अहमदाबादला भेट देणारे ट्रुडो हे जगातील तिसरे पंतप्रधान आहेत.


४३ हजार कोटी रु. चा वार्षिक व्यापार
ट्रुडो पंतप्रधान म्हणून प्रथमच भारतात आले आहेत. भारत-कॅनडात दरवर्षी ४३,१४० कोटी रुपयांचा व्यापार होतो. कॅनडाने एक वर्षात भारतात सुमारे ९६ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. कॅनडा भारतातून मोती, ऑरगॅनिक केमिकल्स, कापड, दुचाकी, सायकली यांची आयात करतो.
- कॅनडात सुमारे १४ लाख भारतीय राहतात. तेथील लोकसंख्या ३.६ कोटी आहे.
- कॅनडा भारताला भाज्या, पेपर, खते, लोखंड, पोलाद, युरेनियम, लाकडी पंपाची निर्यात करतो.


जागतिक माध्यमे
ट्रुडोंच्या दौऱ्याबद्दल जागतिक माध्यमांनी म्हटले आहे की, भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांना अवमान केला आहे. दिल्ली विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी राज्यमंत्र्यांना पाठवले. मोदी सरकारप्रमुखांच्या स्वागतासाठी शिष्टाचार मोडतात.

बातम्या आणखी आहेत...