आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करणी सेनेचा ‘पद्मावत’ चित्रपटास विरोध सुरूच, गुजरातमध्ये पडसाद; भन्साळींचे निमंत्रण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर / अहमदाबाद- संजय लीला भन्साळीच्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पद््मावत चित्रपटास राजपूत संघटनांचा विरोध सुरूच आहे. करणी सेनेने राजस्थानमध्ये जनता संचारबंदी लागू करण्याचे जाहीर केले. दुसऱ्याच दिवशी देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असल्याने ‘भारत बंद’ चा निर्णय मागे घेण्यात आला.  सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित झालाच तर होणाऱ्या संभाव्य परिणामाची जबाबदारी मालकांची असेल, असा इशारा करणी सेनेने दिला आहे.


 चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी करणी सेनेला चित्रपट पाहण्यासाठी निमंत्रण दिले आहे. दरम्यान, गुजरातमध्ये मल्टिप्लेक्स थिएटर्स असोसिएशनने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाच्या विरोधात गुजरातमध्ये निदर्शकांनी गांधीनगर व मेहसाणा येथे शनिवारी दोन सरकारी बसेस  जाळल्या. काही बसेसवर दगडफेकही केली.  
सिनेमागृहात पद््मावत चित्रपट पाहण्यास जनतेने जाऊ नये,  असे आवाहन राजपूत संघटनांनी केले आहे.

 

चित्रपट पाहण्यासाठी भन्साळी यांचे निमंत्रण म्हणजे नाटक 

काळवी म्हणाले, भन्साळी यांनी करणी सेना व इतर राजपूत संघटनांना हा चित्रपट पाहण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. हे निव्वळ नाटक आहे. राजपूत समाजाचा विरोध पाहता अनेक राज्यांनी पद््मावत चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घातली आहे.  यानंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचे नाव ‘पद््मावत’ करण्यास सांगितले होते.

 

जनभावनेपुढे कोणतीही संस्था मोठी नाही 

राजस्थानचे माजी मंत्री देवीसिंह भाटी यांनी बिकानेर येथे सर्वोच्च न्यायालय व सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर भाष्य करताना सांगितले, जनतेच्या भावनेपुढे कोणतीही संस्था मोठी नाही. या चित्रपटात संस्कृतीची मोडतोड करण्यात आली आहे. यासाठीच जनतेचा विरोध आहे. 

 

गुजरातमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार नाही 

पद््मावत चित्रपटावरून गुजरातेत शनिवारी भूज, मेहसाणा, भरूच आणि भावनगर येथे निदर्शने झाली. अहमदाबाद, वडोदरा, राजकोट व मोरबी येथील मल्टिप्लेक्स थिएटर संचालकांनी हा चित्रपट प्रदर्शित  न करण्याचे ठरवले आहे. करणी सेनेने चर्चा  केली होती.