आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - हरियाणाच्या एका रुग्णालयात काही दिवसांपूर्वी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानाच्या पत्नीचे निधन झाले. शनिवारी या शहिदाच्या मुलाने आरोप केला की, आधार कार्ड सोबत नसल्याने डॉक्टरांनी वेळेवर उपचार सुरू केले नाहीत. त्याने मोबाईलमधील आधारची कॉपी दाखवून नंतर हार्ड कॉपी जमा करतो असे सांगितले होते. पण डॉक्टरांनी ते ऐकले नाही. करगिलमध्ये शहीद झालेले कॅप्टन विजयंत थापर यांचे वडील व्हीएन थापर यांनी ही घटना अमानवी असल्याचे सांगत यामुळे सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मनोबल कमी होईल असे म्हटले आहे. डॉक्टरांनी मात्र आरोप फेटाळले आहेत.
मुलगा म्हणाला होता, तासाभरात आधार देतो
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार करगिलमध्ये शहीद जालेल्या जवानाचा मुलगा पवन कुमार त्याच्या आईची तब्येत खराब झाल्याने त्यांना घेऊन सोनिपतच्या हॉस्पिटलमध्ये गेला होता.
- पवनने आरोप केला की, आईची तब्येत फार खराब होती. डॉक्टरांनी आधार कार्ड मागितले, त्यावेळी मी आईचे आधार कार्ड सोबत नेले नव्हते. मी मोबाईलमधील कॉपी दाखवली आणि तुम्ही उपचार सुरू करा मी तासाभरात घरून आधार आणतो, असे मी म्हणालो. पण त्यांनी तसे करण्यास स्पष्ट नकार दिला.
डॉक्टर काय म्हणाले ?
सोनिपतच्या हॉस्पिटलमध्ये असलेले डॉक्टर म्हणाले की, आम्ही उपचारासाठी कधीही नाही म्हणत नाही. ते रुग्णाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले नव्हते. आधारसाठी आम्ही कधीही उपचार थांबवले नाहीत. उपचारासाठी आधार अनिवार्य नाही, पण डॉक्युमेंटेशनसाठी ते लागते.
त्रासदायक बातमी : शहीद थापर यांचे वडील
- करगिलमध्ये शहीद झालेले कॅप्टन विजयंत थापर यांचे वडील व्हीएन थापर नोयडामध्ये राहतात.
- त्यांनी सोनिपतच्या घटनेबाबत बोलताना म्हटले की, ही बातमी अत्यंत त्रासदायक आहे. ही घटना अमानवी असून यामुळे सैनिकांचे मनोबल कमी होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.