आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्फवृष्टीमुळे काश्मीरचा जगाशी संपर्क तुटला; सैन्याच्या 2 चौक्यांना फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- बर्फवृष्टीमुळे काश्मीरचा उर्वरित देशापासून संपर्क तुटला आहे.  विमान सेवा ठप्प झाली आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग आणि मुगल मार्गदेखील पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सैन्य दलाच्या दोन चौक्यांना फटका बसला असून पाच जवान बेपत्ता झाले आहेत.   जम्मू व काश्मीरमधील सध्याची परिस्थिती गुरुवारपर्यंत राहील.

 

काश्मीर व उर्वरित देशाला जोडणारा ३०० किलोमीटरचा मार्ग बर्फवृष्टीमुळे बंद झाला आहे. त्यात जवाहर बोगद्याचाही समावेश आहे. बंद ठेवावी लागली. बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे. उत्तर भारतातील अनेक भागांत धुक्यामुळे १५ रेल्वेगाड्या रद्द करण्यात अाल्या, तर २७ गाड्या विलंबाने धावत अाहेत. नागरिक बर्फ वितळवून पाण्याचा उपयाेग करत अाहेत.

गुलमर्ग गारठले, उणे ६.५

जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी थंडीचा अधिक कडाका जाणवला. तापमान ६.५ सेल्सियस अंश असे नोंदवण्यात आले. पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गुलमर्गमध्ये चांगलीच बर्फ वृष्टी झाल्याने चार फूट बर्फ साचल्याचे पाहायला मिळाले. श्रीनगरमध्ये मंगळवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस झाला.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, केदारनाथमध्ये बर्फ... 

बातम्या आणखी आहेत...