आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरुपयोग टाळण्यासाठी ‘आधार’ लॉक करता येते; अशी घ्या खबरदारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- आता बँक, निवृत्तिवेतनासह विविध शासकीय सेवांसाठी आधार कार्ड क्रमांक मागितला जातो. मोबाइलसाठी नवे सिम घ्यायचे असेल तरी आधार कार्डाचा क्रमांक मागितला जातो. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती अथवा डाटा सार्वजनिक होण्याची शक्यता अाहे. त्यामुळे तुमचा अाधार क्रमांक सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइनवरून आधार क्रमांक सुरक्षित करू शकता. 


सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  तुमच्या बँक खात्यास आधार क्रमांक लिंक असेल आणि बनावट कॉलवरून तुमचा आधार क्रमांक मागितला गेला तर खरा क्रमांक देऊ नका. आधी तर तुम्हाला आलेला कॉल तपासून पाहा. आधार कार्डाच्या तज्ज्ञ कुमुदकुमार कर्ण यांनी सांगितले, सुरक्षेच्या दृष्टीने लोकांनी आधार क्रमांक लॉक करणे आवश्यक आहे. भाेपाळ जिल्ह्यात २३ लाख अाधार कार्ड आहेत.  


डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी काही खास उपाययोजना  
यूआयडीएआयच्या वेबसाइट udai.gov.inवर जाऊन तुमचा अाधार क्रमांक लॉक- अनलॉक करू शकता.  
१. वेबसाइटवर लॉक-अनलाॅकच्या ऑप्शनवर क्लिक करून अाधार क्रमांक टाकावा. रजिस्टर्ड मोबाइलवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर लॉक-अनलॉक करता येते.  
२. मोबाइल क्रमांक बदलला अथवा मोबाइल हरवल्यास तो अपडेट करावा. हे काम ऑफलाइन करता येते. यासाठी आधार कार्ड सोबत घेऊन अाधार सेवा केंद्रावर जावे लागेल.  


अशी घ्या खबरदारी  
- फोनवर अाधार क्रमांक कोणाही अनोळखी व्यक्तीस सांगू नका.  
- दुसऱ्या कोणाच्या दस्तएेवजावर अथवा मोबाइल क्रमांकावर तुमचा आधार क्रमांक लिंक करू नका.  
- आधारसंबंधातील तक्रारी टोल फ्री क्रमांक १९४७ अथवा help@uidai.gov.in वर तक्रार द्या.  

बातम्या आणखी आहेत...