आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निपाह विषाणूग्रस्तांची सेवा करणाऱ्या नर्सचा मृत्यू; पतीला भावनिक पत्र लिहून केले हे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोझिकोड - केरळच्या कोझिकोड येथे निपाह व्हायरस पीडित रुग्णांची सेवा करताना नर्स लिनी यांना जीव गमवावा लागला आहे. पेरांबरा तुलक्यातील हॉस्पटलमध्ये त्या काम करत होत्या. निपाह व्हायरस पीडित रुग्णांची सेवा करताना, त्यांनाही या विषाणूची बाधा झाली. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपण आता वाचू शकत नाही, तेव्हा त्यांनी पतीला पत्र लिहून मुलांची काळजी घेण्याचे भावनिक पत्र लिहिले. 'आता मी तुम्हाला भेटू शकत नाही. मुलांची काळजी घ्या.' या व्हायरसने केरळमध्ये आतापर्यंत 13 जणांचा बळी घेतला आहे. मंगळवारी आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. तर 25 रुग्णांवर उपचार सुरु आहे. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी लिनीला श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, लिनीची निस्वार्थ सेवा कायम स्मरणात राहील. 

 

शेवटच्या क्षणी कुटुंबातील कोणीही नव्हते सोबत 
- पेरांबरा तालुका रुग्णालयात कार्यरत 31 वर्षीय नर्स लिनीच्या शेवटच्या क्षणी तिच्या कुटुंबातील एकही सदस्य तिच्या सोबत नव्हता. तिचे पती हे आखाती देशात नोकरीला आहेत, तर दोन लहान मुले घरी होती, त्यांना या व्हायरसचे संक्रमण होण्याची भीती होती. 
- लिनी या केरळच्या चेंबानोडा भागातील रहिवासी होत्या. त्यांच्यावर आरोग्य विभागाने विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केले. 

 

एकाच कुटुंबातील तीन जणांची केली होती सुश्रुषा 
- लिनी या गुरुवारी सायंकाळी 6 वाजता ड्यूटीवर आल्या होत्या. त्यानंतर निपाह व्हायरसने ग्रस्त एकाच कुटुंबातील तीन जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. या तिन्ही पेशंट्सची लिनी यांनी रात्रभर सुश्रुषा केली होती. त्या त्यांच्यासोबत बातचीत करत होत्या. यानंतर या तिन्ही पेशंट्सचा मृत्यू झाला. या पेशंट्सच्या सुश्रुषे दरम्यानच लिनी यांना व्हायरसचे संक्रमण झाल्याची शक्यता हॉस्पिटलने वर्तवली आहे. 

 

लिनी यांना दोन मुले
- लिनी यांना सिद्धार्थ (5 वर्षे) आणि रितुल (2 वर्षे) ही दोन मुले आहेत. शेवटच्या क्षणी त्या आपल्या दोन्ही मुलांनाही भेटू शकल्या नाही. त्यांचे पती सजीश यांना लिनीच्या प्रकृतीबद्दल समजल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच ते बहरेन येथून केरळला परतले होते.  

 

'वडीलांसारखे एकटे राहू नका, मुलांना सोबत घेऊन जा'
- नर्स लिनी यांच्या मृत्यूवर केरळचे पर्यटन मंत्री कदाकमपल्ली सुरेंद्रन यांनी दुःख व्यक्त केले आहे. लिनी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी तिने तिच्या पतीला लिहिलेले पत्र फेसबुकवर शेअर केले आहे. त्यात म्हटले आहे, 'मला नाही वाटत की आता आपली भेट होऊ शकेल. कृपया आपल्या मुलांची काळजी घ्या. त्यांना सोबत ठेवा. तुम्ही आखाती देशात जाताना त्यांनाही तुमच्या सोबत घेऊन जा. माझ्या वडिलांसारखे मुलांना सोडून एकटे राहू नका.'

 

बातम्या आणखी आहेत...