आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रानेच कापला दोस्ताचा गळा, क्रुर हत्येमागे अशी आहे कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- खंडवा येथील गंभीर-खिरकिया येथे गुरूवारी रात्री झालेल्या युवकाच्या हत्येचा पोलिसांनी खुलासा केला आहे. हत्या करणाऱा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून युवकाचा मित्रच असल्याचे उघड झाले आहे. दुसऱ्या एका मित्रासोबत तो मृत युवाकाला घेऊन गेला होता आणि संधी मिळातच त्याने त्याचा गळा कापला. दुसऱ्या मित्राने कॉल करून नातेवाइकांना युवकाच्या हत्येची माहिती दिली. प्राथमीक चौकशीत प्रेमसंबंधातून घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.


पोलिसांनी सांगितले की, 19 वर्षीय अर्पित अशी तरूणाची ओळख पटली आहे. अर्पित गेल्या काही वर्षांपासून हरदा येथे आत्याकडे राहत होता. तेथेच तो कॉलेजमध्ये शिकत होता. गुरूवारी रात्री 9 वाजेच्या आरोपी आदिम आय्युब खान त्याला बाईकवर बसून घेऊन गेला, तेव्हा त्याच्यासोबत हेमंत राठोड देखील होता. त्यानंतर अर्ध्या तासाने हेमंतने अर्पितच्या घरी जाऊन त्याच्या हत्येची माहिती दिली.


नातेवाइकांकडे लपला होता आदिम....
हत्येनंतर फराप आदिम देवास येथील खातेगावात नातेवाइकाकडे लपून बसाला होता. खंडवा, किल्लोद आणि हरदा पोलिसांनी वेग-वेगळ्या टीम बनवून तपास सुरू केला. घटनेनंतर 20 तासातच पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी त्याला अटक केली.


पाच दिवसांपासून अर्पितला भेटण्याचा अग्रह करत होता आदिम
पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर हेमंतने सांगितले की, आदिम गेल्या पाच दिवासंपासून त्याला अर्पितला भेटण्याचा अग्रह करत होता. गुरूवारी संध्याकाळी तिन्ही आधी गंभीर येथे गेले. बाइक आदिम चालवत होता. परतताना आदिमने एका शेतात गाडी घेण्यास सांगितले तो आणि आर्पित मागे बसले. हेमंतने सांगितले की या दरम्यान आदिमने अर्पितच्या गळ्यावर धारदात शस्त्राने वार केले, तो हेमंतला म्हणाला की तु पळून जा नाहीतर मारला जाशील.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...