आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: या राजाला 60 राण्या; शौकही असे, जेवण म्यानमारमध्ये झोप भारतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोहिमा - नागालंडच्या लोंगवा गावात असाही एक राजा आहे ज्याला तब्बल 60 राण्या आहेत. या राजाचे शौक इतके आलीशान आहेत, की तो म्यानमारमध्ये जेवतो आणि झोपण्यासाठी भारतात येतो. कारण, लोंगवा गावाचा अर्धा भाग म्यानमार आणि अर्धा भाग भारतात आहे. दोन्ही देशांच्या सीमा याच गावातून जातात. या गावात राहणाऱ्या लोकांना कोन्याक आदिवासी समाज म्हणूनही ओळखले जाते. कोन्याक आदिवासींच्या या राजाचे नाव अंग नगोवांग आहे. त्याच्या अख्त्यारीत केवळ लोंगवाच नव्हे, तर आसपासचे 70 गाव येतात. या आदिवासी समुदायाच्या आपल्याच रुढी परमपरा आहेत. 

 

रोजगार नसल्याने अफूचा व्यापार...
लोंगवा गावात या राजाचे घर आहे. तब्बल 60 पत्न्या असलेल्या या राजाचे मोठे प्रस्थ आहे. त्या राण्यांपासून असलेल्या मुला-मुलींची संख्या मोजल्यास त्यांचेच एक गाव होऊ शकते. या राजाच्या राज्यात लोकांना रोजगार नाहीत. त्यामुळे, हे लोक अफूची शेती करून विकतात. त्या सर्व कारभारावर राजा अंग नगोवांग आणि त्याच्या कुटुंबियांचे नियंत्रण आहे. 


माणसांना मारून डोके घेऊन फिरायचे हे आदिवासी...
या आदिवासी समुदायाच्या लोकांना कोन्याकसह हेड हंटर्स या नावानेही ओळखले जाते. कारण, हे लोक माणसांना मारून त्यांचे डोके सोबत घेऊन जायचे. 1960 नंतर अशा प्रकारच्या माणसांची शिकार बंद झाली. तरी आजही या समुदायांच्या घरांमध्ये त्या मारलेल्या माणसांच्या कवट्या सजलेल्या दिसून येतात. राज्यात असलेल्या कुठल्याही आदिवासी लोकांच्या तुलनेत कोन्याक समुदायाची लोकसंख्या अधिक आहे. हे लोक नागमिस भाषा बोलतात. ही भाषा नागा आणि आसामी भाषेच्या मिश्रणाने बनली आहे. 


व्हिसाविना परदेशवारी
भारत आणि म्यानमार सीमेवर असलेल्या या लोकांना दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. अशात ते म्यानमार ते भारत आणि भारत ते म्यानमार असा रोज प्रवास करतात. लोंगवा गावातील लोकांना तर दोन्ही देश एका पावलाच्या अंतरावर आहे. त्यामुळे, व्हिसा नसतानाही हे लोक दोन्ही देशांमध्ये मनसोक्त जाऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...