आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे \'दलित नाय‍क\' म्‍हणून ओळखले जातात मल्लिकार्जुन खरगे, संपत्‍ती वाचून व्‍हाल थक्‍क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांची महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खरगेंना मराठी भाषा उत्‍तम बोलता येते.  

खर्गे हे कर्नाटकमधील बिदर-गुलबर्गा येथील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. त्‍यांना काँग्रेसचे दलित नायक म्‍हणून ओळखले जाते.

 

नुकतेच खरगे यांनी दलितांच्‍या मुद्द्यावरून भाजपवर हल्‍लाबोल केला होता. पंतप्रधान मोदींना ते म्‍हणाले होते, 'दलितांना किमान ते आत्‍मसन्‍मानपुर्वक उद‍रनिर्वाह करू शकतील एवढी तरी जमिन द्या.' त्‍यानंतर केवळ 15 मिनिटांमध्‍येच मोदींनी खरगेंच्‍या संपत्‍तीची माहिती देऊन त्‍यांचे पितळ उघडे पाडले होते. यासंबंधी मोदींनी काही कागदपत्र सादर केली. त्‍यानूसार खरगे यांची संपत्‍ती खालीलप्रमाणे आहे. 

  

- कर्नाटकमध्‍ये बन्‍नेरघट्टा रोडवर 500 कोटी रुपयांचा एक मोठा कॉम्‍प्‍लेक्‍स खरगे यांच्‍या नावावर आहे. 

- चिक्‍कमगलुरू जिल्‍ह्यातील 300 एकरची जमिन ज्‍याची किंमत जवळपास 1000 कोटी रुपये आहे, ती खरगेंच्‍या नावावर आहे. 
-चिक्‍कमगलुरू जिल्‍ह्यात एक घर आहे ज्‍याची किंमत 50 कोटी रुपये आहे. 
- बंगळुरूच्‍या केंगेरीमध्‍ये 40 एकराचे फार्म हाऊस आहे. 
- बंगळुरूमध्‍ये एम.एस. रामय्या कॉलेजजवळील एक इमारत खरगेंच्‍या नावावर आहे. ज्‍याची किंमत जवळपास 25 कोटी रुपये आहे. 
- बंगळुरूच्‍या आर. टि. नगरमध्‍ये एक मोठा बंगलाही आहे. 
- बल्‍लारी रोडजवळ 17 एकर जमीन आहे.   
- बंगळुरूच्‍या इंद्रानगरमध्‍ये 3 मजली बंगला आहे. 
- बंगळुरूच्‍या सदाशिव नगरमध्‍ये खरगे यांच्‍या नावावर आणखी दोन बंगले आहेत. 


याशिवायही खरगे यांच्‍या नातेवाईकांचीही देशातील महानगरांमध्‍ये जसे की, म्‍हैसूर, गुलबर्गा, चेन्‍नई, गोवा, पुणे, मुंबई आणि दिल्‍ली येथे रिअल इस्‍टेटमध्‍ये मोठी गुंतवणूक आहे. यांची किंमत जवळपास 1000 कोटी रुपयांच्‍या घरात असल्‍याचे सांगितले जाते. अशाप्रकारे खरगेंची एकुण संपत्‍ती 50,000 कोटी रुपयांहून अधिक असल्‍याने त्‍यांच्‍या संपत्‍तीबद्दल आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे.     

 

 

 

    

 

 

 

बातम्या आणखी आहेत...