आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरियाची होसंग करणार 250 कोटींची गुंतवणूक; 1200 लोकांना मिळणार रोजगार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दक्षिण कोरियातील होसंग ही सर्वात मोठी कंपनी औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीत (ऑरिक) गुंतवणूक करणार असून १८ फेब्रुवारी रोजी मुंबईत मॅग्नेटिक महाराष्ट्र प्रदर्शनात हा करार होणार आहे. होसंगकडून ऑरिकमध्ये २५० कोटीपेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. 


दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) शेंद्रा आणि बिडकीन परिसरात १० हजार एकर क्षेत्रावर ऑरिकची उभारणी केली जात आहे. ऑरिकमध्ये अँकर प्रोजेक्ट आणण्याचे प्रयत्न गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहेत. विदेशी कंपन्या येतात, जागा पाहून जातात, असेच चित्र होते. किया मोटर्स गेल्यानंतर उद्योग खात्यातील अधिकाऱ्यांनी विविध देशांना भेटी देऊन ऑरिकची प्रभावी मार्केटिंग केली होती. त्याचा परिणाम म्हणून औरंगाबादमध्ये पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी होसंगने केली आहे. होसंगचे मुख्यालय सेऊल येथे आहे. केमिकल, इंडस्ट्रियल मशिनरी, टेक्स्टाइल, वीज उपकरणे, बांधकाम, दुचाकी वाहने, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात कंपनीने विस्तार केला आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी शेंद्रा येथील जागेची पाहणी करून गुंतवणुकीस हिरवी झेंडी दाखवली होती. 


१२०० लोकांना मिळणार रोजगार 
पहिल्या टप्प्यात कंपनीकडून २५० कोटींची गुंतवणूक केली जाईल. यातून १२०० जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. होसंगकडून औरंगाबादेत विजेची उपकरणे बनवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...