आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशासाठी प्रेयसीने केली प्रियकराची हत्या, पैशासाठी करत होती Blackmail

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नोयडातील सोनम नावाच्या एका तरुणीचे एका तरुणावर प्रेम जडले. पण फक्त प्रेमावर ती आनंदी नव्हती. तर तिला त्या प्रेमाच्या मोबदल्यात तरुणाकडून पैसाही हवा होता. त्यामुळे ती तरुणाला ब्लॅकमेल करत होती. प्रियकराने जेव्हा याला विरोध केला तेव्हा तिने थेट त्याचा काटाच काढला. एका गावात जीतेंद्र नावाच्या या तरुणाचा मृतदेह आढळला. जीतेंद्रच्या कुटुंबीयांनी सोनमबाबत पोलिसांत तक्रार केली. त्याआधारे पोलिसांनी तिला अटक केली. 


सोनमची परिसरात दहशत आहे असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. त्याचे कारण म्हणजे बीएचे शिक्षण घेणारी सोनम सोबत बंदूक घेऊन फिरत असते. तिला दोन भाऊ आहेत. वडील दिल्लीत एका अधिकाऱ्याची गाडी चालवतात. भाऊ तिच्या वर्तणुकीने त्रस्त झाल्याने तिच्याशी संबंध ठेवत नाहीत. आईबरोबर ती गावात एकटी राहते. पोलिसांना जीतेंद्र आणि सोनमच्या अफेयरबाबत समजले. सोनम जीतेंद्रला ब्लॅकमेल करत होती असा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला लाकडी खाटेचा पाय आणि स्कुटी जप्त केली आहे. 

 

जीतेंद्र विवाहित होता म्हणून सोनम त्याच्या पत्नीला सर्वकाही सांगण्याच्या नावाखाली त्याला ब्लॅकमेल करत होती अशी माहितीही समोर येत आहे. जीतेंद्रच्या कॉल डिटेल्सवरून पोलिसांना समजले की, सोनम आणि त्याच्यात वारंवार बोलणे व्हायचे. पोलिसांनी सोनमची चौकशी केली तेव्हा सोनमने कबुली देत तिचा अपराध स्वीकारला आहे. तिने सांगितले की तिनेच जीतेंद्रला फोन करून भेटण्यासाठी बोलावले होते. त्याठिकाणी दोघे दारु प्यायले. सोनम जीतेंद्रला संबंध टेवण्याच्या मोबदल्यात पैसे मागत होती. पैसे मिळाले नाही तर त्याला अडकवण्याची धमकी देत होती. जीतेंद्रने पैसे द्यायला नकार दिला तर तिने लाकडी खाटीच्या पायाने त्याची हत्या केली. त्यानंतर ती स्कुटी घेऊन फरार झाली. पण पोलिसांनी तिला अटक केली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...