आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे हॉटेल टेंडर घोटाळ्यात ईडीने जप्त केली लालूंच्या मॉलची जमीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रेल्वे हॉटेल टेंडर घोटाळ्यात मंगळवारी कारवाई करत त्यांच्या कुटुुंबाच्या नावावर पाटण्यात बांधकाम होत असलेली मॉलची जमीन जप्त केली आहे.  


ईडीने लालू कुटुंबाच्या नावावरील पाटण्यापासून जवळ रूपसपूरमध्ये मॉलसाठी घेतलेली जमीन जप्त केली आहे. मॉलबाहेर ईडीने एक नोटीस डकवली असून संपत्ती जप्त करण्याची माहिती दिली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), प्राप्तिकर विभाग व ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे.  


या प्रकरणी सर्वात आधी ईडीने कारवाई करत राजद अध्यक्ष यादव यांची पत्नी राबडीदेवी, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव व राजद अध्यक्षांची चौकशी केली होती. यानंतर ईडीने बांधकाम सुरू असलेली संपत्ती जप्त केली हाेती.  

बातम्या आणखी आहेत...