आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

925 कोटी रुपये आणि 13 चोर, असा होता-होता राहिला सर्वात मोठा दरोडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - सोमवारी मध्यरात्री साधारण 2.30 वाजता एका बँकेववर होणारा दरोडा होता होता राहिला. यावेळी बँकेमध्ये साधारण 925 कोटी रुपये होते, हे विशेष. 

 

कुठे झाली घटना 
- राजस्थानमधील जयपूरमध्ये एक्सिस बँकेच्या मुख्य शाखेवर सोमवारी रात्री दरोडा टाकण्यासाठी जवळपास 13 दरोडेखोर आले होते. 

- सुरक्षा रक्षकाने सांगितले, की एक कार गेटसमोर येऊन उभी राहिली. त्यातून जवळपास 13 जण खाली उतरले. 

- गेटवरुन उडी मारुन ते बँकेच्या आवारात दाखल झाले.
- मुख्य दरवाजावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन त्याचे हातपाय बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर चॅनल गेटने आतमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात दरोडेखोर होते. 
- तिथे आधीपासून एक पोलिस कर्मचारी तैनात होता. प्रत्येक बँकेच्या मुख्य शाखेत एक पोलिस कर्मचारी तैनात असतो, हे फार कमी लोकांना माहित असते. 
- दरोडेखोरांना पाहून पोलिस कर्मचारी सीताराम यांनी फायरिंग केले. गोळीबाराचा आवाज ऐकून दरोडेखोरांनी तिथून पळ काढला. 
- या घटनेची माहिती मिळताच अशोक नगर पोलिस स्टेशनचे अधिकारी फौजफाट्यासाठी दाखल झाले. 

 

बंदूक आणि पोते घेऊन आले होते दरोडेखोर 
- पोलिस कर्मचारी सीताराम यांनी सांगितले, की बँकेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांकडे बंदूक आणि पोते होते. बँकेतून नोटांची बंडले नेण्यासाठी त्यांनी पोते आणले असतील अशी शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...