आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षामुळे नेते,कार्यकर्त्यांना अाेळख : दिग्विजय सिंह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबलपूर -  पक्षामुळेच नेते व कार्यकर्त्यांना अाेळखले जात असल्याचे सांगून काँग्रेसचे महासचिव व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी नेहमीच पक्षहितासाठी काम करावे, असे अावाहन केले. ते बुधवारी येथे पत्रकारांशी बाेलत हाेते.  
या वेळी सिंह यांनी मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यातील अाेरछा येथून सुरू हाेणाऱ्या अापल्या समन्वय यात्रेबाबत पत्रकारांना माहिती दिली.

 

या यात्रेचा मुख्य उद्देश पक्षाचा प्रत्येक नेता व कार्यकर्त्याशी संपर्क साधून त्यांना पक्षहितासाठी काम करण्यास प्रेरित करणे हा अाहे. तसेच यात्रेदरम्यान मी स्वागत व घाेषणाबाजीपासून दूर राहीन व पक्षनेते व कार्यकर्त्यांना नि:स्वार्थवृत्तीने पक्षासाठी काम करण्याचे अावाहन करेन. पक्षामुळेच अापल्याला मान-सन्मान मिळाला अाहे, याची जाण ठेवून पक्षासाठी काम करावे. असे केले तरच पक्ष सर्वांच्या सन्मानाचे संरक्षण करेल. तथापि, पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते एकजूट असून, ते पक्षासाठीच काम करत असल्याचेही सिंह यांनी सांगितले.   देशात काँग्रेसची स्थिती वाईट आहे. त्या पार्श्वभूमीवर नेते कामाला लागले. 

 

शेतकऱ्यांचा अावाज दाबला जाताेय   
राज्यातील सरकारवर टीका करताना सिंह यांनी राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांचा अावाज दाबला जात असून, काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा अाराेपही या वेळी केला. शेतकऱ्यांकडून बाँडपेपर भरले जात अाहेत व त्याचे काँग्रेसकडे पुरावे अाहेत. मात्र, काँग्रेस कुणाच्याही दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांच्या अधिकारांसाठी अावाज उठवत राहील, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...