आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10Km चालला होता, आता खात्यात आहे 36 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या फोटोमुळे चर्चेत आला होता दाना मांझी. अनेक लोकांनी केली आर्थिक मदत. आता बँक खात्यात आहेत 36 लाख रुपये. - Divya Marathi
या फोटोमुळे चर्चेत आला होता दाना मांझी. अनेक लोकांनी केली आर्थिक मदत. आता बँक खात्यात आहेत 36 लाख रुपये.

गरियाबंद- गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ही घटना बातम्यांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. एका व्यक्तीने पत्नीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10 किमी प्रवास केला होता. त्याच्या गरीबीमुळे त्याच्यावर अशी वेळ आली होती. टीबीमुळे पीडित असलेल्या पत्नीच्या मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याच्याकडे अॅम्बुलन्ससाठीही पैसे नव्हते. परंतु, आज त्या व्यक्तीचे आयुष्य पुर्णपणे बदलून गेले आहे. त्याच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उडीसा सरकारने उचलला असून भुवनेश्वरमध्ये तिला शिकवण्यात येत आहे. त्याचे तिसरे लग्न झाले आहे आणि तो आथात नव्या बाईकवर फिरतोय. एवढेच नाही तर त्या व्यक्तीच्या बँक खाद्यात 36 लाख रुपये जमा झाले आहेत.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- मंगळवारी दाना मांझीने कालाहांडी जिल्ह्यातील भवानीपाटा येथील एका शो-रूमधून नवी बाइक खरेदी केली आहे. बाईक चालवता येत नाही त्यामुळे त्याने आपल्या भाच्याला सोबत आणले होते. त्याची ही बदललेली परिस्थिती पाहून लोकांना ती वेळही आठवली जेव्हा देश-विदेशात तो चर्चेचा विषय बनला होता आणि इंदिरा आवास योजनेतून त्याला एक घर देखील देण्यात आले होते. बहरीन येथील पंतप्रधान पिंस खलीफा बिन सलमान अल खलीफा यांनी त्याला 9 लाख रूपयांनी मदत केली होती. त्याचबरोबर त्याला इतरही लोकांनी मदत केली. यामुळे त्याच्या बँक खात्यात 36 लाख रुपये जमा झाले आहेत.
 

यामुळे आला होता चर्चेत...
उडीसाच्या मागालेला जिल्हा कालाहांडी येथील दाना मांझीला आपल्या दुसऱ्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10 किलोमीटर पर्यंतचा पायी प्रवास करावा लागला होता. पत्नीला दवाखाण्यातून घरी नेण्यासाठी त्याला कुठलेही वाहन मिळाले नाही आणि अॅम्बुलन्स बुक करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याच्यासोबत त्याची 12 वर्षाची मुलगी देखील होती, ती देखील त्याच्यासोबत पायी चालत होती. हा फोटो सोशल मीडियासह अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला होता. गरीबीचे हे दुख: लोकांनी माझीच्या या परिस्थितीतून पाहिले होते.


फोटो : संदीप राजवाड़े
 
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...